ETV Bharat / state

एमआयएमच्या नगरसेवकांमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वाढला - चंद्रकात खैरे - shivsena

फुसके विषय काढायचे आणि गोंधळ घालायचा ही एमआयएमची प्रथा आहे. सर्व खासदारांचे महानगरपालिकेने अभिनंदन केले आहे. त्यामुळे जलील यांचे विशेष अभिनंदन करण्याची गरज नाही, असे मत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी मांडले.

शिवसेना माजी खासदार चंद्रकांत खैरे
author img

By

Published : Jun 13, 2019, 9:31 PM IST

औरंगाबाद - फुसके विषय काढायचे आणि गोंधळ घालायचा ही एमआयएमची प्रथा आहे. सर्व खासदारांचे महानगरपालिकेने अभिनंदन केले आहे. त्यामुळे जलील यांचे विशेष अभिनंदन करण्याची गरज नाही, असे मत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी मांडले. एमआयएमचे नगरसेवक जसे महापालिकेत निवडून आले तसे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वाढला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

शिवसेना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा आरोप

एमआयएमचे नगरसेवक पालिकेचे कामकाज सुरळीत चालु देत नाहीत. कुठल्याही विषयाला विरोध करतात, असा आरोप खैरे यांनी केला. एमआयएमला विकासाचे काहीही पडले नसून ते विकास कामांमध्ये अडथळे आणतात. त्यांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे खैरे म्हणाले.

सर्वसाधारण सभेत महापौरांनी चांगली भूमिका घेतली. महापौरांना अधिकार आहेत, त्यानुसार नगरसेवकांना बाहेर काढले. त्यात काही चूक नाही, अशी महापौरांची पाठराखण चंद्रकात खैरे यांनी केली. नवनिर्वाचित खासदार ईम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव पालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांनी मांडला होता. तो मान्य न झाल्याने २५ नगरसेवकांनी गोंधळ घातला. गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना निलंबीत करण्यात आले आहे.

Intro:काहीतरी फालतू, फुसके विषय काढायचे आणि गोंधळ घालायचा ही एमआयएमची प्रथा आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलीय.Body:आज सर्वसाधारण सभेत महापौरांनी चांगली भूमिका घेतली. महापौरांना अधिकार आहेत, त्यानुसार नगरसेवकांना बाहेर काढलं त्यात काही चूक नाही, अशी पाठराखण केली. आज एमआयएमच्या नागसेवकांनी चांगलाच गोंधळ घातला. महापौरांनी सगळ्याच खासदारांच अभिनंदन केलं त्यामुळे स्पेशली अभिनंदन करण्याची गरज नाही असं खैरे यांनी सांगितलं. Conclusion:एमआयएम जशी महानगर पालिकेत निवडुन आली तसा शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काहीतरी बोलतील कुठल्याही विषयाला विरोध करतील. शहराच्या विकासाची कामे करू देत नाहीत. महापौरांना काहीही बोलतात. हे असं चालणार नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.