ETV Bharat / state

भाजप करणार कलम 370 बाबत जनजागृती; देशात काढणार 300 हून अधिक यात्रा - Maharashtra assembly election 2019

भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री भारतात जवळपास 300 हुन अधिक संवाद यात्रा काढणार आहेत. मराठवाड्यात 10 ठिकाणी ही संवाद यात्रा घेण्यात येणार  आहे.  या संवाद यात्रेत भाजपचे राम माधव, अॅड. खासदार मीनाक्षी लेखी, किरीट सोळंकी, रावसाहेब दानवे यांच्यासारखे नेते मार्गदर्शन करणार आहेत

राष्ट्रीय एकात्मता अभियानाचे मराठवाडा संयोजक बसवराज मंगरुळे पत्रकार परिषदेत बोलताना
author img

By

Published : Sep 28, 2019, 8:15 PM IST

Updated : Sep 28, 2019, 8:43 PM IST

औरंगाबाद - जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यांनातर विरोधकांनी भाजपविरोधात टीका करायला सुरुवात केली. या विरोधाचा परिणाम मतदारांवर होऊ नये, यासाठी भाजपचे दिग्गज नेते आता कलम 370 बाबत जनजागृती करणार आहेत.

राष्ट्रीय एकात्मता अभियानाचे मराठवाडा संयोजक बसवराज मंगरुळे यांची प्रतिक्रिया

भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री भारतात जवळपास 300 हुन अधिक संवाद यात्रा काढणार आहेत. मराठवाड्यात 10 ठिकाणी ही संवाद यात्रा घेण्यात येणार आहे. या संवाद यात्रेत भाजपचे राम माधव, अॅड. खासदार मीनाक्षी लेखी, किरीट सोळंकी, रावसाहेब दानवे यांच्यासारखे नेते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय एकात्मता अभियानाचे मराठवाडा संयोजक बसवराज मंगरुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होत आहे. प्रचारात विरोधक कलम 370 वरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न करणार हे नक्की. मात्र, त्याआधीच भाजपच्या दिग्गज नेत्यांनी या मुद्द्यावरून मतदारांवर परिणाम होऊ नये, म्हणून रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - ओवैसी यांनी केली औरंगाबाद शहरातील तीन उमेदवारांची घोषणा

भाजप सरकारने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वात काश्मीरबाबत ऐतिहासिक पाऊल उचलून कलम 370 आणि 35 अ रद्द केले आहे. मात्र हे कलम काय आहे आणि हे रद्द करणे का गरजेचे आहे, याबाबत देशातील नागरिकांना माहिती व्हावी, याकरता भाजपच्या राष्ट्रीय एकता अभियान यांच्या अंतर्गत देशात संवाद यात्रा घेण्यात येणार आहे. यामध्ये देशात 300 हून अधिक यात्रा काढण्यात येणार आहेत.

हेही वाचा - या वयात पवारांना बदनामी सहन करावी लागते, हे पटलं नाही - अजित पवार

मराठवाड्यात या यात्रेचा एक टप्पा असून जवळपास 10 ठिकाणी संवाद यात्रा घेण्यात येणार आहे. सोमवारी म्हणजेच 30 सप्टेंबरला भाजपचे राम माधव आणि रावसाहेब दानवे औरंगाबादेत नागरिकांना या कलमा बाबत जनजागृती करणार असल्याची माहिती राष्ट्रीय एकात्मता अभियानाचे मराठवाडा संयोजक बसवराज मंगरुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमात व्यापारी, डॉक्टर, इंजिनियर, विद्यार्थ्यां यांनी यावे, असे आवाहन करण्यात आल्याचे देखील बसवराज मंगरुळे यांनी सांगितले.

हेही वाचा - 'कुटुंबात गृहकलह नाही; शरद पवार सांगतील तेच आम्ही सर्व जण ऐकतो'

Intro:काश्मीर मधून कलम 370 हटवल्यांनातर देशात भाजप विरोधात विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. या विरोधाचा परिणाम मतदारांवर होऊ नये यासाठी भाजपचे दिग्गज नेते आता कलम 370 बाबत जनजागृती करणार आहेत.

Body:भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री भारतात जवळपास 300 हुन अधिक संवाद यात्रा काढणार आहेत. मराठवाड्यात 10 ठिकाणी ही संवाद यात्रा घेण्यात येणार असून या संवाद यात्रेत भाजपचे राम माधव, ऍड खासदार मीनाक्षी लेखी, किरीट सोळंकी, रावसाहेब दानवे यांच्यासारखे नेते मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती राष्ट्रीय एकात्मता अभियानाचे मराठवाडा संयोजक बसवराज मंगरुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होत आहे, प्रचारात विरोधक कलम 370 वरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न करणार हे नक्की, मात्र त्याआधीच भाजपच्या दिग्गज नेत्यांनी या मुद्द्यावरून मतदारांवर परिणाम होऊ नये म्हणून रणनीती आखल्याच दिसून येत आहे.

Conclusion:भाजप सरकारने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वात काश्मीर बाबत ऐतिहासिक पाऊल उचलून कलम 370 आणि 35 A रद्द केला आहे. मात्र नेमकं हे कलम काय आहे आणि हे रद्द करणे का गरजेचे आहे या बाबत देशातील नागरिकांना माहिती व्हावी याकरिता भाजपच्या राष्ट्रीय एकता अभियान यांच्या अंतर्गत देशात संवाद यात्रा घेण्यात येणार आहे. यामध्ये देशात 300 हून अधिक यात्रा काढण्यात येणार आहेत. मराठवाड्यात या यात्रेचा एक टप्पा असून जवळपास 10 ठिकाणी संवाद यात्रा घेण्यात येणार असून सोमवारी म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी भाजपचे राम माधव आणि रावसाहेब दानवे औरंगाबादेत नागरिकांना या कलम बाबत जनजागृती करणार असल्याची माहिती राष्ट्रीय एकात्मता अभियानाचे मराठवाडा संयोजक बसवराज मंगरुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमात व्यापारी, डॉक्टर, इंजिनियर, विद्यार्थ्यांनी यावं अस आवाहन करण्यात आल्याचे देखील बसवराज मंगरुळे यांनी सांगितलं.
byte - बसवराज मंगरुळे - राष्ट्रीय एकात्मता अभियान मराठवाडा संयोजक
Last Updated : Sep 28, 2019, 8:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.