औरंगाबाद - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळी आठपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान झाले. यात अंदाजे ६३.०५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील एकूण २०६ मतदान केंद्रांवर मतादान झाले. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सकाळी आठ वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळपर्यंत पार पडले. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रशासनाच्यावतीने सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या व्यवस्था करण्यात आल्या होत्या.
हेही वाचा - साडे अठराशे लोकसंख्येच्या गावात दोनच पदवीधर मतदार!