ETV Bharat / state

Aurangabad Crime: औरंगबाद जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचे रॅकेट? गोळी लागून चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू - गावठी कट्टा रॅकेट औरंगाबाद

गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला आहे. आर्यन राहुल राठोड असे मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यापूर्वीच चिमुकल्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने वडिलांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

औरंगबाद जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचे रॅकेट
kid dies after fathers country made gun misfires
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 11:04 AM IST

Updated : Aug 29, 2023, 10:52 AM IST

पोलिसांनी दिली प्रतिक्रिया

गंगापूर(औरंगाबाद) - गंगापूर शहरातील अहिल्यादेवीनगर येथे नवनाथ अंबादास भराड यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर बीड येथील दाम्पत्य राहुल राठोड पत्नी संगीता राहुल राठोड व त्यांचा अंदाजे अडीच वर्षांच्या मुलगा आर्यनसह भाडेकरू म्हणून चार महिन्यापासून राहत होते. राहुल हे शहरातील खासगी कर्ज वितरण करणाऱ्या बँकेत कामाला आहेत. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घरातून अचानक जोराचा आवाज झाला. त्यानंतर संगीता व राहुल जखमी मुलगा आर्यनला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी आर्यनची आई संगीता यांच्या मुलाला गोळी लागली. मुलाला गोळी लागली असं म्हणून त्या जोरजोरात रडत होत्या.

गोळीबार झालेल्या घरासमोर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. गोळीबार झालेल्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घराची झडती घेतली. त्यांना स्वयंपाक घरामध्ये पोटमाळीवर गावठी कट्टा आढळून आला. त्यातील मॅगझीनमध्ये तीन गोळ्या लोड केलेल्या होत्या. यातील दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यावेळी घरात रक्ताचे जागोजागी थेंब पडले होते.

बँक कर्मचाऱ्याकडे कट्टा आला कसा ?- भाडेकरू म्हणून राहणाऱ्या व बँक कर्मचारी असलेल्या राहुल राठोड याच्याकडे गावठी कट्टा कुठून आला? घरात गोळीबार नेमका कसा झाला? गोळीबारात आर्यनच्या डोक्याला गोळी कशी लागली? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे. पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे. गोळीबार झाल्याची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. तसेच अचानक झालेल्या गोळीबाराने शहरासह परिसरामध्ये खळबळ उडाली होती. गोळीबार झालेल्या अहिल्यानगर परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलीस उपनिरीक्षक दीपक आवटी यांच्या पथकाने पंचनामा केला.

आईचा आक्रोश मन हेलवणारा- गोळीबारात जखमी झालेल्या आर्यनला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवले होते. वडीलाला पोलिसांनी अटक केल्याने उपचार सुरू असलेल्या मुलाजवळ आई व नातेवाईक होते. रविवारी सकाळी अकरा वाजता त्याचा उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हे समजताच आर्यनच्या आईने रुग्णालयात आक्रोश केला. यावेळी नातेवाईकांसह उपस्थितीतांचे डोळे पाणावले.

गावठी कट्टा खरेदी विक्रीचे रॅकेट उघड येण्याची शक्यता- राहुल राठोड यांनी गावठी कट्टा कोठून व कशासाठी खरेदी केला ? पोलिसांच्या तपासात गावठी कट्ट्याचे खरेदी विक्रीचे रॅकेट उघड येणार का? हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक आवटी हे करत आहेत.

हेही वाचा-

  1. Firing In Pune : गुन्हेगारी वर्चस्ववादातून पुण्यात दोन गुंडांमध्ये गोळीबार
  2. Thane Gangwar : गँगवॉर! स्वतःच्याच टोळीतील गुंडावर पिस्तूलमधून झाडली गोळी; दोन गुंडांना अटक

Last Updated : Aug 29, 2023, 10:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.