कन्नड (औरंगाबाद): ऊसाने भरलेले ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने एक पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कचरू चव्हाण असे त्यांचे नाव आहे. कन्नड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात ते कार्यरत होते. कन्नड औरंगाबाद रस्त्यावरील कन्नड पासून जवळच असलेल्या मकरनपूर पुलाजवळ हा अपघात झाला. ऊसाने भरलेला ट्रॅक्टर बारामती कारखान्याकडे जात होता. त्याच वेळी कन्डनहून पोलीस कर्मचारी कचरू चव्हाण हे मोटारसायकल वर पेट्रोल भरण्यासाठी जात होते त्यावेळी हा अपघात झाला. या अपघातात ऊसाने भरलेल्या ट्रॅकटरचे चाक कचरू यांच्या पोटावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी तात्काळ उचलून कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान या अपघातात प्रकरणी ट्रॅक्टर चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ऊसाचा ट्रॅक्टर अंगावर गेल्याने पोलीस कर्मचार्याचा जागीच मृत्यू - कन्नड ट्रॅक्टर अपघात बातमी
ऊसाने भरलेले ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने एक पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कचरू चव्हाण असे त्यांचे नाव आहे. कन्नड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात ते कार्यरत होते. कन्नड औरंगाबाद रस्त्यावरील कन्नड पासून जवळच असलेल्या मकरनपूर पुलाजवळ हा अपघात झाला.