ETV Bharat / state

औरंगाबादेत गेल्या 12 तासांमध्ये 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, मृतांचा आकडा 55 वर - औरंगाबाद कोरोना न्यूज

घाटीत आतापर्यंत 50 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात 70 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून मृतांची एकूण संख्या 55 झाली आहे.

औरंगाबादेत गेल्या 12 तासांमध्ये 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, मृतांचा आकडा 55 वर

author img

By

Published : May 25, 2020, 8:17 PM IST

औरंगाबाद - येथील घाटी रुग्णालयात 11 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाल्याने ते आज कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे उपचार पूर्ण झालेल्या रुग्णांची संख्या 630 झाली आहे, तर औरंगाबाद शहरातील चार आणि सिल्लोड येथील एक अशा एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 55 वर पोहोचली आहे.

औरंगाबादेत गेल्या तीन दिवसांपासून बाधित रुग्णांच्या नव्याने वाढणाऱ्या संख्येत घट झाली आहे. सोमवारी 16 नवे रुग्ण वाढले आहेत. जी संख्या काही दिवसांपूर्वी 50 च्या वर होती. एकूण बधितांची संख्या 1301 झाली आहे, तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये बेगमपुरा, गांधी नगर, हिमायत नगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, बारी कॉलनी, रेहमानिया कॉलनी, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये कटकट गेट येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा 24 मे रोजी रात्री 9.30 वाजता, गारखेडा येथील 48 वर्षीय पुरूष रुग्णाचा 24 मे रोजी रात्री 9.35 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. 25 मे रोजी मध्यरात्री एक वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील 35 वर्षीय महिलेचा, कैलास नगरातील 75 वर्षीय महिलेचा पहाटे 3.15 वाजता आणि सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा सकाळी 6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत रुग्णांमध्ये एक पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे. घाटीत आतापर्यंत 50 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात 70 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून मृतांची एकूण संख्या 55 झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.