ETV Bharat / state

शिवजयंती मिरवणुकीत तरुणाची हत्या, एकाला अटक तर दुसरा फरार - शिवजयंती मिरवणुकीत तरुणाची भोसकून हत्या

शिवजयंतीच्या मिरवणुकीत औरंगाबादमध्ये एका तरुणाची भोसकून हत्या केल्याची घटना घडली. ही घटना बुधुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, एक आरोपी फरार आहे.

21 year Young man murder in Aurangabad
शिवजयंती मिरवणुकीत तरुणाची भोसकून हत्या
author img

By

Published : Feb 20, 2020, 5:08 PM IST

Updated : Feb 20, 2020, 5:40 PM IST

औरंगाबाद - झेंडा फिरवण्याच्या कारणावरुन शिवजयंतीच्या मिरवणुकीत २१ वर्षीय तरुणाची भोसकून हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, जोपर्यंत दुसरा आरोपी अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. या घटनेनंतर पुंडलीकनगर भागातील बाजारपेठेतील दुकाने तरुणांनी बंद केली होती.

बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास श्रीकांत गोपीचंद शिंदे या 21 वर्षीय तरुणाची झेंडा दिला नाही या रागातून राहुल सिद्धेश्वर भोसले व विजय शिवाजी वैध या दोघांनी धारदार तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली. या हत्येनंतर पसार झालेला आरोपी विजय वैधला पुंडलीकनगर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. मात्र, या घटनेतील प्रमुख आरोपी राहुल भोसले हा अद्याप फरार आहे. आरोपी पकडण्यात आल्याची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईक मित्र परिवाराने पुंडलीकनगर पोलीस ठण्यासमोर गर्दी केली होती. सुमारे दीडशे ते दोनशे नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण होते.

शिवजयंतीच्या मिरवणुकीत औरंगाबादमध्ये एका तरुणाची भोसकून हत्या

या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल भोसलेला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या आरोपीला देखील लवकरच अटक करू असे, आश्वासन दिल्यानंतर हा जमाव पोलीस ठाण्यातून निघून गेला. मात्र, दुपारपर्यंत मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलेला नव्हता.

सकाळी पोलीस ठाण्यात जमलेल्या जमावातील 50 ते 60 जणांनी पुंडलीकनगर चौक गाठत चौकातील दुकाने बंद केली. या वेळी बँकेतील नागरिकांना बाहेर काढून बँकही बंद करण्यात आली. दुपारपर्यंत दुकाने बंद करण्यात आली होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Last Updated : Feb 20, 2020, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.