औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 1,335 नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर 17 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रोज रुग्णसंख्या नवीन उच्चांक गाठत असल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढत आहे. त्यानुसार अनेक नवे निर्बंध प्रशासनातर्फे लावण्यात आले आहेत.
सध्या जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 61,435 एवढी झाली आहे. बुधवारी 442 जणांना (मनपा 357, ग्रामीण 85) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 52,515 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच, कोरोनामुळे आजपर्यंत एकूण 1,368 जणांचा मृत्यू झाला असून, सध्या एकूण 7,552 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
आज नोंद झालेले 17 मृत्यू पुढीलप्रमाणे -
घाटी रुग्णालय..
- पुरूष / वय- 65 / पत्ता- श्रध्दा कॉलनी औरंगाबाद
- पुरूष / वय- 68 / पत्ता- एन 9 सिडको, औरंगाबाद
- स्त्री / वय- 58 / पत्ता- इंदिरा नगर, औरंगाबाद
- पुरूष / वय- 75 / पत्ता- मुकुंदवाडी, औरंगाबाद
- स्त्री / वय- 60 / पत्ता-तांदुळवाडी, लासुरगांव
- पुरूष / वय- 55 / पत्ता-पळशी, औरंगाबाद
- पुरूष / वय- 40 / पत्ता- एन 6 सिडको, औरंगाबाद
- स्त्री / वय- 55 / पत्ता- बीड, बायपास, औरंगाबाद
- स्त्री / वय- 51 / पत्ता- इंदिरा नगर, औरंगाबाद
- पुरूष / वय- 50 / पत्ता- वाकड, कन्नड, औरंगाबाद
खासगी रुग्णालय..
- पुरूष / वय- 38 / पत्ता- बालाजी नगर, क्रांती चौक, औरंगाबाद
- स्त्री / वय- 71 / पत्ता- एन 4, सिडको, औरंगाबाद
- पुरूष / वय- 70 / पत्ता- एन 6, सिडको, औरंगाबाद
- पुरूष / वय- 88 / पत्ता- गादीया विहार, औरंगाबाद
- पुरूष / वय- 82 / पत्ता- बीड बायपास, औरंगाबाद
- स्त्री / वय- 92 / पत्ता- चंद्रगुप्त नगर, औरंगाबाद
- पुरूष / वय- 68 / पत्ता- एन 6 सिडको, औरंगाबाद
जिल्हा प्रशासनाने लावले नवे निर्बंध..
आरोग्य मंत्रालय, भारत सरकार व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनानूसार कोरोनाग्रस्त रुगणाच्या इतर लोकांनी संपर्कात येऊ नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे चर्चा करणे, कार्यक्रमाचे आयोजन करणे इ. बाबींमुळे या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे लोकांच्या एकत्र येण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
त्यामुळे सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद आणि डॉ. निखील गुप्ता पोलीस आयुक्त, ओरंगाबाद (शहर) यांनी औरंगाबाद जिल्ह्यात (शहर तसेच ग्रामीण) फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार शुक्रवार दिनांक 19 मार्च 2021 ते रविवार दिनांक 04 एप्रिल 2021 पर्यंत मनाई आदेश निर्गमीत केले आहेत.
सदरील मनाई आदेश हे रात्री 8.00 वाजेपासून ते सकाळी 5.00 वाजेपार्यत लागू राहतील. यामध्ये वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, मिडीया संदर्भातील सेवा, दूध व्रिक्री व पुरवठा इ. तसेच पेट्रोल पंप, गॅस एजन्सी इ. सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा (खाजगी व शासकीय), बांधकामे, उद्योग व कारखाने, बँक व पोस्ट सेवा संदर्भात त्यांचे नियमानुसार सेवा सुरू ठेवण्यास मुभा राहील.