अमरावती - राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येला आटोक्यात आणण्यासाठी तसेच कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत राज्यात शुक्रवार सायंकाळ ते सोमवार सकाळपर्यंत विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज (दि. 10 एप्रिल) अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातही विकेंड लॉकडाऊन पाडला जात आहे. चांदुर रेल्वे तालुक्यासह शहरातही या विकेंड लॉकडाउनला लोकांनी चांगला प्रतीसाद दिला आहे. आज सकाळपासून मुख्य बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पसरला होता. या विकेंड लॉकडाऊनमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सेवा सुरू आहे. यामध्ये किराणा दुकान दूध फळभाज्या, रूग्णालय सुरू आहे.
चांदुर रेल्वेतही कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा
राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. अशातच चांदुर रेल्वेमध्ये लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही परत जावे लागल्याची घटना समोर आली आहे.
हेही वाचा - अमरावती : रस्त्यावरची गर्दी ओसरली; अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू