ETV Bharat / state

कोल्हापूरी बंधाऱ्याच्या धर्तीवर बच्चू कडूंच्या संकल्पनेतून साकारला विदर्भात पाहिला 'विदर्भ बंधारा'

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या अचलपूर-चांदुर बाजार मतदासंघात आता पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहिम हाती घेतली आहे. कोल्हापूरी बंधाऱ्याच्या धर्तीवर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून नदीवर विदर्भ बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये वाचवून केवळ तीन कोटी मध्ये एका नदीवर बांधलेला विदर्भ बंधाऱ्यामूळे दीड किलोमीटर पर्यंत नदीत पाणी साचले आहे. या पहिल्याच विदर्भ बंधाऱ्याचा लेखाजोखा जलसंपदा मंत्र्यांना दाखवून हा पॅटर्न राज्यभर राबवणार असल्याचं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं.

विदर्भ बंधारा
विदर्भ बंधारा
author img

By

Published : Jun 15, 2021, 11:21 AM IST

अमरावती - राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या अचलपूर-चांदुर बाजार मतदासंघात आता पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहिम हाती घेतली आहे. कोल्हापूरी बंधाऱ्याच्या धर्तीवर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून नदीवर विदर्भ बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये वाचवून केवळ तीन कोटी मध्ये एका नदीवर बांधलेला विदर्भ बंधाऱ्यामूळे दीड किलोमीटर पर्यंत नदीत पाणी साचले आहे. या बंधाऱ्याच्या माध्यमातून परिसरातील गावांना व शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. विदर्भातील या पहिल्याच विदर्भ बंधाऱ्याचा लेखाजोखा जलसंपदा मंत्र्यांना दाखवून हा पॅटर्न राज्यभर राबवणार असल्याचं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं.

कोल्हापूरी बंधाऱ्याच्या धर्तीवर बच्चू कडूंच्या संकल्पनेतून साकारला विदर्भात पाहिला 'विदर्भ बंधारा'

जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या मतदारसंघात विविध नदीवर पाणी साठवण्यासाठी बंधारे बांधण्याची तयारी केली आहे जलसंपदा विभागामार्फत अनेक नदीवर आता कोल्हापूर बंधाराच्या धर्तीवर विदर्भ बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे. नदीमध्ये खोल डोह करून त्यात पाणी साठवण्याचा काम या बंधाऱ्याच्या मार्फत केल्या जात आहे बच्चू कडू यांनी यापूर्वीही त्यांच्या बेलोरा या गावात नदीचे खोलीकरण केल. आहे या खोलीकरणाच्या माध्यमातून पहिल्याच पावसात बेलोरा गाव पाणीदार झाला आहे त्याच पार्श्वभूमीवर आता मतदारसंघातील नदीही तुडुंब भरायला सुरुवात झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.