ETV Bharat / state

'सर्व्हर डाऊन' झाल्याने लसीकरणासाठी ज्येष्ठांना राहावे लागले ताटकळत

सोमवारपासून (1 मार्च) देशभरात 45 वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लस देण्यात येत आहे. मात्र, अमरवतीतील जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रातील सर्व्हर डाऊन झाल्याने लसीकरण बंद करण्यात आले होते.

रुग्ण
रुग्ण
author img

By

Published : Mar 2, 2021, 7:44 PM IST

Updated : Mar 2, 2021, 8:06 PM IST

अमरावती - कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत कोरोना योद्ध्यांनंतर 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण सुरू झाले असताना दुसऱ्याच दिवशी सर्व्हर डाऊन झाल्याने अमरावती शहरातील जिल्हा रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालय या लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांवर ताटकळत राहण्याची वेळ आली. या प्रकरामुळे वृद्धांसह त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला.

आढावा घेताना प्रतिनिधी

लसीकरणाचे काम बंद

ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी कोविन अ‌ॅपवर नोंदणी करावी लागते. तसेच लसीकरण केंद्रांवर सुद्धा नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरण मोहीम गतीने व्हावी यासाठी आशा वर्करकडून ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकलीत केली जात आहे. असे असताना आज परिचारिका महाविद्यालय केंद्रांवर सकाळपासून शहरातील विविध भागातून ज्येष्ठ नागरिक लस घेण्यासाठी पोचले असताना सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगत लसीकरण काम बंद केले.

सोमवारी 22 जणांना पाठवले परत

सोमवारी (दि. 1) ज्येष्ठांच्या लसीकरणाचा पहिला दिवस होता. मात्र, पहिल्या दिवशी दुपारनंतर सर्व्हर डाऊन झाल्याने एकूण 22 ज्येष्ठ नागरिकांना घरी परत पाठविण्यात आले. आज (दि. 2) सोमवारी परत गेलेल्या 22 जणांची वेगळी रांग केंद्रांवर लावण्यात आली. मात्र, आजही सर्व्हर बंद असल्याने या 22 जणांसह केंद्रावर आलेल्या अनेकांना लसीपासून वंचित राहावे लागले.

केंद्रांवर सुविधेचा अभाव

सर्व्हर डाऊन असल्याने यावर कोणताही तोडगा प्रशासनाच्या वतीने काढण्यात आला नाही. सर्व्हर कधी कनेक्ट होईल याची शाश्वती नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना केंद्रांवर अनेक तास थांबावे लागले. या केंद्राबाहेर मोठा पडदा मारण्यात आला असला तरी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक लस न घेताच घरी परत गेले.

रजिस्टरवर नाव नोंदविण्याची मागणी

सर्व्हर डाऊन असल्याने लसीकरण थांबवू नका. आमची नावे एखाद्या रजिस्टरवर लिहून घ्या. आमचा आधार कार्ड क्रमांकही नमूद करून घ्या आणि आम्हला लस द्या. सर्व्हर कनेक्ट झाल्यावर आमचे नाव, माहिती तुम्ही त्यात नोंदवा, अशी विनंतीही अनेकांनी केली. मात्र, सर्व्हर शिवाय काहीही होणार नाही असे केंद्रांवर सांगण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस घेण्यासाठी सर्व्हर कनेक्ट होण्याची प्रतीक्षा करावी लागली.

हेही वाचा - अमेझॉनवरुन 35 हजारांच्या कॅमेऱ्याऐवजी आले 'बॉडी स्प्रे'

Last Updated : Mar 2, 2021, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.