ETV Bharat / state

दर्यापूर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये युवकासह दोघांचा नदीत बुडून मृत्यू - drowning cases in amravati

जिल्ह्यातील अनेक नदी-तलावांमध्ये पोहायला गेलेल्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना वाढत आहेत. दर्यापूर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये १७ वर्षीय युवकासह दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. पूर्णा व चंद्रभागा नदीत बुडाल्याने या युवकांचा मृत्यू झाला. या दोघांचे मृतदेह सापडले आहेत.

दोघांचा नदीत बुडून मृत्यू
दोघांचा नदीत बुडून मृत्यू
author img

By

Published : Sep 29, 2020, 2:59 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील अनेक नदी-तलावांमध्ये पोहायला गेलेल्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना वाढत आहेत. दर्यापूर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये १७ वर्षीय युवकासह दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. पूर्णा व चंद्रभागा नदीत बुडाल्याने या युवकांचा मृत्यू झाला. या दोघांचे मृतदेह सापडले आहेत.

दर्यापूर तालुक्यात दोघांचा नदीत बुडून मृत्यू
दर्यापूर तालुक्यातील उपराई येथील अमन विद्याधर खंडारे हा सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान गावातील चार मित्रांसोबत पूर्णा नदीवर पोहायला गेला होता. नदीपात्रात पोहण्यासाठी उडी मारताच अमन पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. घटनेबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी गर्दी केली. अमनचा मृतदेह नजिकच्या सोनारखेड गावाजवळ आढळून आला.

दुसऱ्या घटनेत नरदोळा येथील प्रथमेश विजय काळे हा युवक गावात शेजारून वाहत असलेल्या चंद्रभागा नदीवर पोहायला गेला होता. याच दरम्यान नदीपात्रात पोहता पोहता वाहून गेला. याची माहिती पोलीस पाटलांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथमेशचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले. त्यांनी त्याचा मृतदेह शोधून काढला.

हेही वाचा - ऊसतोड कामगारासाठी तोडगा काढावा; कारखानदारांचे शरद पवारांना साकडे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.