अमरावती - धारणी शहरापासून 32 किमी अंतरावर असणाऱ्या बैरागड गावात सिलिंडरचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. या स्फोटात दोन भावांच्या घरांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. शेख शेरे अफगाण यांच्या घरात सिलींडरचा स्पोट होऊन शेख चाँद, शेख शेरे अफगाण या दोन्ही भावांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
मंगळवारी दुपारी शेख शेरे अफगाण यांच्या घरातील सिलिंडरचा स्फोट होताच त्यांच्या घराला आग लागली. या आगीची झळ घराला लागून असणाऱ्या शेख चांद शेख शेरे यांच्या घरानेही पेट घेतला. दोन घरांना आग लागताच ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धावपळ केली. आग लागल्याची माहिती मिळताच धारणी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचे वाहन बैरागडला पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत शेख शेरे अफगाण यांचे घर पुर्णतः जाळले असून दुसऱ्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.