अमरावती - एका रात्रीत अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तीन दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना आज सकाळी उघडकिस आली. यातील तिन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेमुळे दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
तिवसा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी कृषी केंद्राचे शटर तोडून चोरटे आत मध्ये शीरले. या दुकानातून १००० रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी पळवली, तर बसस्थानक जवळ असलेले विराज हार्डवेअर अँड मशनरीज दुकान फोडले. याशिवाय शिवकृपा स्पेअर पार्ट या दुकानात सुद्धा चोरट्यांनी प्रवेश केला. या तिन्ही दुकानातील जवळपास 4 हजार रुपयांची चोरी चोरट्यांनी केला. मात्र, दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात तिन्ही चोरटे कैद झाले आहेत. पहाटे आपल्या दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळताच दुकानदारांनी आपल्या दुकानाकडे धाव घेतली. हायवेवर असलेली तिन्ही दुकाने फोडल्याने दुकानदारात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.