अमरावती: आमच्याच भागातले रुग्ण तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात येतात. आमच्याच लोकांमुळे तुम्ही मोठे झाले अशा स्वरूपाची धमकी शहरातील डॉक्टर गोपाल राठी यांना दिली गेली असताना डॉक्टर निशांत नामक एका व्यक्तिने देखील डॉक्टर राठी यांच्या व्हाट्सअप वर नुपूर शर्माला सपोर्ट म्हणजे काय असा सवाल विचारून तुमचा जनसंपर्क प्रमुख आमच्याकडे नेहमीच रुग्णांची माहिती घेण्यासाठी येतो आता यापुढे मात्र तुम्हाला आमच्याकडून रुग्ण मिळणार नाही अशा स्वरूपाचे सांगण्यात आले आहे. डॉक्टर झीशान यांच्या अशा म्हणण्यावर डॉक्टर राठी यांच्याकडून त्याला माफी देखील मागण्यात आली आहे. या संपूर्ण संवादाचा व्हाट्सअप वरील स्क्रीन शॉट सध्या अमरावती शहरात व्हायरल होतो आहे.
डॉक्टर राठी यांच्यासोबत एका डॉक्टरने केलेल्या संवादाचा व्हाट्सअप स्क्रीनशॉट
![threats from the doctor](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-amr-02-threat-from-dictor-vis-7205575_05072022111420_0507f_1656999860_220.jpg)
![threats from the doctor](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-amr-02-threat-from-dictor-vis-7205575_05072022111420_0507f_1656999860_665.jpg)