ETV Bharat / state

खतांच्या भाववाढीविरोधात बच्चू कडूंची 'थाळी बजाओ' आंदोलनाची हाक

केंद्र सरकारच्या या भाववाढीच्या निषेधार्थ राज्यमंत्री बच्चू कडू आता आक्रमक झाले असून येत्या 20 तारखेला राज्यमंत्री बच्चू कडू हे 'ताली बजाओ-थाळी बजाओ' आंदोलन करणार आहे.

बच्चू कडूंचे ताली बजाव थाळी बजाओ आंदोलन
खतांच्या भाववाढीविरोधात बच्चू कडूंची 'ताली बजावो' आंदोलनाची हाक
author img

By

Published : May 18, 2021, 7:00 PM IST

अमरावती - लॉकडाऊनमुळे शेतकरी पूरता डबघाईला आलेला असतानाच आता रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या भाववाढीच्या निषेधार्थ राज्यमंत्री बच्चू कडू आता आक्रमक झाले असून येत्या 20 तारखेला राज्यमंत्री बच्चू कडू हे 'ताली बजाव-थाळी बजाओ' आंदोलन करणार आहे. 20 मे रोजी सायंकाळी सहा वाजता आपल्या घरीच प्रत्येक शेतकऱ्याने हे आंदोलन करण्याचे आवाहनही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे. तसेच तूर, मूग, उडीद या कडधान्याची आयात थांबवण्याची मागणीही बच्चू कडू यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

bacchu kadu agitation against Rising prices of fertilizers in amravati
बच्चू कडूंचे आंदोलन

भाववाढीविरोधात बच्चू कडू आक्रमक -

खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच आता काही दिवसांपूर्वीच या वर्षीच्या रासायनिक खतांचे दर घोषित करण्यात आले आहे. या वाढत्या खतांच्या किमतीमुळे शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. आधीच शेतात शेत शेतमालाचे नुकसान त्यात लॉकडाऊनचा फटका यामुळे शेतकरी संकटात असताना आता खतांच्या वाढत्या किमतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे खतांच्या किमती कमी करण्यासाठी शेतकरी नेते सध्या मागणी करत आहे आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करण्याची मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू आता हे आंदोलन करणार आहे.

हेही वाचा - अमरावती जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक; लसीकरण केंद्रावर शुकशुकाट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.