ETV Bharat / state

अमरावती विभागात दिलासादायक जलसाठा; अप्परवर्धा धरणात 59 टक्के पाणी

अमरावती विभागातील सर्व 25 मध्यम प्रकल्पात 62.25 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. अमरावती विभागात एकूण 477 लघु प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये 55.83 टक्के जलसाठा आहे.

अप्परवर्धा धरणात 59 टक्के पाणी
अप्परवर्धा धरणात 59 टक्के पाणी
author img

By

Published : Aug 10, 2021, 8:05 PM IST

अमरावती - यंदा अमरावती विभागात अनेक ठिकाणी पुराचा तडाखा बसला आहे. असे असले तरी विभागातील अनेक धरण पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. अमरावती जिल्ह्यात सिभोरा येथील अप्पर वर्धा धरण हे विभागातील सर्वात मोठे धरण आहे. त्यात सध्या 59 टक्के जलसाठा आहे. विभागातील सर्व धरणांची परिस्थिती पाहता या सर्व धरणात दिलासादायक जलसाठा आहे.

विभागातील 9 मोठ्या प्रकल्पांत 60.10 टक्के जलसाठा

अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात 59 टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात 100 टक्के पाणी भरले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती प्रकल्पात 73.42, बेंबळा प्रकल्पात 68.54 टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात 67.75 टक्के, वान प्रकल्पात 54.52 टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नाळगंगा धरणात 28.08 जलसाठा आहे. पेनकाळी प्रकल्पात 33.40 टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात 14.28 टक्के जलसाठा आहे. हे सर्व 9 प्रकल्प विभागातील महत्त्वाचे प्रकल्प आहेत. त्यात सध्या 60.10 टक्के जलसाठा आहे. या सर्व प्रकल्पांची संकल्पित उपयुक्तता 1399.91 दशलक्ष घनमीटर आहे. त्यात सध्या 841.32 दशलक्ष पाणी साठा उपलब्ध आहे.

अमरावती विभागात दिलासादायक जलसाठा

हेही वाचा-कलम 370 रद्द केल्यानंतर 'इतक्या' लोकांनी काश्मीरात घेतली जमीन, सरकारने लोकसभेत दिली माहिती

अशी आहे विभागातील मध्यम प्रकल्पांची परिस्थिती

  • अमरावती विभागात एकूण 25 मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी अमरावती जिल्ह्यातील शहानुर प्रकल्पात 68.61 टक्के जलसाठा आहे. तसेच चंद्रभागा प्रकल्पात 73.87 टक्के, पूर्णा प्रकल्पात 69.27 टक्के, सापन प्रकल्पात 69.27 टक्के, पांढरी प्रकल्पात 9 टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपुस प्रकल्पात 75.79 टक्के, सायखेडा प्रकल्पात 100 टक्के, गोकी प्रकल्पात 45.80 टक्के, वाघाडी प्रकल्पात 86 टक्के, बोरगाव प्रकल्पात 56.13 टक्के जलसाठा आहे.
  • अकोला जिल्ह्यातील सोनल प्रकल्पात 72.40 टक्के आणि एकबुर्जी धरणात 100 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्पात 74.48 टक्के, पलढग प्रकल्पात 13.98 टक्के, मस प्रकल्पात 51.06 टक्के, कोरडी प्रकल्पात 100 टक्के, मन प्रकल्पात 68.40 टक्के, तोरणा प्रकल्पात 44.23 टक्के आणि उठवळी प्रकल्पात 91.01 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. विभागातील सर्व 25 मध्यम प्रकल्पात 62.25 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.
    अप्परवर्धा धरणात 59 टक्के पाणी
    अप्परवर्धा धरणात 59 टक्के पाणी

हेही वाचा-ओबीसी आरक्षणावरून ओवैसी मोदी सरकारला म्हणाले, प्यार किया तो डरना क्या?

लघु प्रकल्पात 59.22 टक्के जलसाठा
अमरावती विभागात एकूण 477 लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पाची संकल्पित उपयुक्तता 1150.74 दशलक्ष घनमीटर आहे. सध्या, यामध्ये 642.21 दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.