ETV Bharat / state

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा धरणात बुडून मृत्यू - पूर्णा नदी

यश त्याच्या मित्रांनी सोबत पोहायला जाण्याचा बेत आखला होता. त्यानुसार तो आपल्या ७ ते ८ मित्रांसोबत जवळच असलेल्या हिंगणी येथील पूर्णा नदीवरील धरण प्रकल्पावर पोहायला गेला होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा धरणात बुडून मृत्यू
author img

By

Published : Jul 14, 2019, 10:20 AM IST

अमरावती - येथील दर्यापूर तालुक्यातील हिंगणी मिर्जापूरजवळ पूर्णा नदीच्या धरणात बूडून १८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा मुलगा शालेय मित्रांसोबत धरणावर पोहायला गेला होता. यश भांडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा धरणात बुडून मृत्यू

मृत यश भांडे (रा.चांदखेड, ता. दर्यापूर) हा सामदा येथे महर्षी वाल्मिकी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. शिक्षणासाठी तो दर्यापूर येथील कास्तकार कॉलनीमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. व तेथून ये-जा करीत होता. त्याच्या मित्रांनी सोबत पोहायला जाण्याचा बेत आखला. त्यानुसार तो आपल्या ७ ते ८ मित्रांसोबत जवळच असलेल्या हिंगणी येथील पूर्णा नदीवरील धरण प्रकल्पावर पोहायला गेला.

पाण्यात उतरल्यावर यश याचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर बाजूच्या शेतातील आणि हिंगणी येथील रहिवासी प्रशांत गावंडे आणि वेदांत गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत त्यांनी दर्यापूर पोलिसांना माहिती दिली. शेतकरी कुटुंबातील असलेल्या यशच्या मृत्युमुळे चांदखेड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात धरणात बुडून विदयार्थ्याचा मृत्यू

अमरावती अँकर

शालेय मित्रांसोबत धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या अठरा वर्षीय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावतीच्या दर्यापुर तालुक्यातील हिंगणी मिर्जापुर नजीक असलेल्या पूर्णा नदीच्या धरण प्रकल्पावर घडली . यश भांडे असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. 

 दर्यापूर तालुक्यातील चांदखेड येथील रहिवासी असलेला यश भांडे हा सामदा येथील महर्षी वाल्मिकी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. दर्यापूर येथील कास्तकार कॉलनी येथे भाड्याने खोली करून  शिक्षणासाठी तो ये-जा करीत होता .दरम्यान जवळ असलेल्या हिंगणी येथील पूर्णा नदीवरील धरण प्रकल्पावर पोहण्यासाठीजाण्याचा बेत आखला होता. त्या प्रमाणे दुपारी बारा वाजता दरम्यान सात ते आठ मित्रांसोबत यश तेथे गेला मित्रांसोबत पाण्यात उतरल्यावर मृतक यश याचा पाय घसरून खोल पाण्यात पडला त्याला पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर बाजूच्या शेतात असलेल्या हिंगणी येथील रहिवाशी प्रशांत गावंडे आणि वेदांत गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दर्यापूर पोलिसांनी माहिती दिली शेतकरी कुटुंबातील असलेल्या यशाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे  चांदखेड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.