अमरावती - गणपती विसर्जनावेळी वाठोडा शुक्लेश्वर येथे पूर्णा नदीत वाहून गेलेल्या 4 जणांचा शोध घेण्यासाठी सुरू असणारी शोध मोहीम आज आठव्या दिवशी थांबवण्यात आली. 8 दिवसांच्या शोध मोहिमेत जिल्हा प्रशासनाच्या शोध पथकाने 3 जणांचे मृतदेह नदी बाहेर काढले असून 1 मृतदेह अद्यापही सापडला नाही.
गणपती विसर्जनादरम्यान वाठोडा शुक्लेश्वर येथून वाहणाऱ्या पूर्णा नदीत गौरखेडा येथील रहिवासी सतीश सोळंके, ऋषिकेश वानखडे, संतोष वानखेडे आणि सागर शेंदुरकर हे 4 जण नदीत बुडाले होते. या चौघांचा शोध घेण्यासाठी जिल्हा बचाव आणि शोध पथकाने पूर्णा नदीत शोध मोहीम राबविली. या शोध मोहिमेदरम्यान शुक्रवारी सकाळी संतोष वानखडे यांचा मृतदेह हाती लागला. शुक्रवारी सायंकाळी सागर शेंदुरकर याचा मृतदेह नदी बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश मिळाले होते. तर रविवारी ऋषिकेश वानखेडे यांचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला. दरम्यान, पूर्णा नदीतून 3 मृतदेह मिळाल्यावर सतीश सोळंके याचा शोध सुरू होता. दरम्यान आज आठव्या दिवशी जिल्हा बचाव शोध पथकाने पूर्णा नदीतील मोहीम थांबविली आहे. हेही वाचा - मोदींचा "बडबोल्यां"साठीचा "राम बाण" नेमका कोणासाठी ?
या बचाव मोहिमेदरम्यान सतिश सोळंकेचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलीस सोळंकेच्या शोध घेण्याबाबत शुक्रवारी ग्रामस्थांसोबत चर्चा करणार आहेत.
हेही वाचा - यंदाचा 'ग्लोबल गोलकीपर' पुरस्कार मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना...!