ETV Bharat / state

Puja At Ravi Rana Amravati House : अमरावतीत राणांच्या घरी होमहवन, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही लावला - नवनीत राणाच्या घरी पुजा

खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांच्या अमरावती येथील शंकर नगर स्थित निवासस्थाने युवा स्वाभिमान पार्टीच्या ( Yuva Swabhiman Party Puja ) कार्यकर्त्यांनी होम हवन केले आहे.

Puja At Ravi Rana Amravati House
Puja At Ravi Rana Amravati House
author img

By

Published : Apr 24, 2022, 10:10 PM IST

अमरावती - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांच्या अमरावती येथील शंकर नगर स्थित निवासस्थाने युवा स्वाभिमान पार्टीच्या ( Yuva Swabhiman Party Puja ) कार्यकर्त्यांनी होम हवन केले आहे. विशेष म्हणजे हनुमानाच्या फोटो सोबतच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही होम-हवन पूजेत लावला आहे. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी ही पूजा केली जात असल्याचे युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शांततेसाठी पूजा - गत काही दिवसांपासून हनुमान चालीसा पठणाच्या विषयावरून राणा आणि शिवसेनेत खडाजंगी सुरू असून मुंबईला मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणासाठी गेलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली आहे. राणा यांच्या मुंबई आणि अमरावतीच्या घरासमोर शिवसैनिकांनी शनिवारी दिवसभर गोंधळ घातला असल्याने शिवसैनिकांना सद्बुद्धी देवो आणि शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी ही पूजा केली जात असल्याची माहिती युवा स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. आमदार राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी शनिवारी गोंधळ घातल्यानंतर आता या परिसराच्या शुद्धीकरणासाठी हा होमहवन केला जात असल्याचा युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष जितू चव्हाण यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला शांती लाभो, यासाठी सुद्धा होम हवन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - Uddhav Thackeray Meet Chandrabhaga Shinde : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह घेतली 'फायर आज्जीची' भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.