ETV Bharat / state

मेळघाटातील धक्कादायक प्रकार; सोनोग्राफीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला 6 तास ठेवले ताटकळत - गर्भवती महिलेला धारणी रुग्णालयात वाट पहावी लागली

सोनोग्राफी करण्यासाठी धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात गेलेल्या गर्भवती ( pregnant woman kept waiting in dharni hospital ) आदिवासी महिलेला अपशब्द बोलून तिला 6 तास ताटकळत ठेवल्याचा ( pregnant woman sonography melghat ) प्रकार समोर आला आहे.

pregnant woman kept waiting in dharni hospital
गर्भवती महिलेला धारणी रुग्णालयात वाट पहावी लागली
author img

By

Published : Aug 8, 2022, 7:05 AM IST

अमरावती - सोनोग्राफी करण्यासाठी धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात गेलेल्या गर्भवती ( pregnant woman kept waiting in dharni hospital ) आदिवासी महिलेला अपशब्द बोलून तिला 6 तास ताटकळत ठेवल्याचा ( pregnant woman sonography melghat ) प्रकार समोर आला आहे. गर्भवती महिला ही धारणी तालुक्यातील चिचघाट येथील ( dharni hospital in melghat news ) रहिवासी आहे.

माहिती देताना गर्भवती महिला

हेही वाचा - Har Ghar Tiranga : हजारो युवकांचा हातात तिरंगा घेऊन रॅलीत सहभाग; 'हर घर तिरंगा' अभियान

धारणी तालुक्यातील चिचघाट येथील कविता राजेश जावरकर या गर्भवती मातेला गावातील आशा वर्कर निर्मला धांडे यांनी सोनोग्राफी करण्यासाठी रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास नेले होते. तेव्हा त्या ठिकाणी कोणतेही डॉक्टर उपस्थित नव्हते. उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉ. प्रीती सेंद्रे या आपल्या खासगी रुग्णालयात रुग्ण तपासणी करत होत्या. इकडे गर्भवती कविता मात्र डॉक्टरांची वाट पाहत होत्या. सकाळी 10 वाजतापासून गेलेल्या कविता यांना सायंकाळी 4 वाजेपर्यंत उपाशीपोटी डॉक्टरची वाट पाहावी लागली.

सोनोग्राफीदरम्यान गर्भवती माता कविता जावरकर आणि आशा वर्कर निर्मला धांडे यांना मुले बाळ किती आहेत? अशी विचारणा करण्यात आली. सदर महिलेने आणि आशा वर्करने दिलेल्या उत्तरावर डॉ. प्रीती शेंद्रे यांच्याकडून 'ढोर जानवर जैसे बच्चे पैदा करना' असे अपशब्द बोलून त्यांचा अपमान केल्याची माहिती गर्भवती कविता यांनी 'ईटीव्ही भारत'शी शी बोलताना दिली. या घटनेने गर्भवती महिलेचे मन दु:खावले गेले. शासकीय सेवेत कार्यरत असतानासुद्धा खासगी दवाखाना कसा काय चालवतात? हा मात्र संशोधनाचा विषय आहे. कर्मचारी शासनाकडून रुग्णाला सेवा देण्याकरिता पूर्ण पगार घेऊन सुद्धा वेळ देत नाही, ही चिंतेची बाब आहे.

तर आदिवासी रुग्णालयात येणार नाहीत - मेळघाटात आदिवासी बहुल व अज्ञानी अशिक्षित लोंकामध्ये एका सुशिक्षित महिला डॉक्टरकडून गर्भवती महिलांना अशी असभ्य व गैरजबाबदार वागणूक मिळत असेल तर रुग्ण व गर्भवती महिला शासकीय रुग्णालयात उपचारापासून दुर राहतील. ही मेळघाटासाठी शोकांतिका आहे.

हेही वाचा - Amravati Vidarbha College : शंभर वर्षाच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारे अमरावतीचे 'विदर्भ महाविद्यालय'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.