अमरावती - मंगळवारी दुपारी शहरात अचानक पावसाने हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत गारवा पसरला असून आता अमरावतीकरांना मान्सूनची प्रतीक्षा आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यभरात मुसळधार पाऊस झाला. यानंतर आता पूर्वमान्सूनच्या सरी बरसत आहेत. उद्यापासून राज्यभरात मान्सून दाखल होणार असून ११ तारखेपर्यंत सक्रिय होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच १५ जूनपासून संपूर्ण राज्यात मान्सूनच्या सरी बरसणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. मराठवाडा आणि विदर्भात 11 तारखेपासून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
खरीप हंगामाची सुरवात झाल्याने मोठ्या प्रमाणात नांगरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी पहिल्या टप्प्यातील पेरण्यांची प्रक्रिया पूर्ण झालीय. या हंगामात तूर, कापूस, सोयाबीन, ज्वारी, सूर्यफूल आणि तृणधान्य घेण्यात येतात.