ETV Bharat / state

पायाभूत सुविधेसाठी पाण्यात उतरून प्रहारचे अर्धनग्न आंदोलन

दर्यापूर तालुक्यातील येवदा गावातील इदग्गा ते लेंडीपुरा हा प्रमुख मार्ग आहे. हा मार्ग अनेक वर्षांपासून नादुरूस्त आहे. यामुळे प्रहार संघटनेच्या वतीने पाण्यात (सोमवारी) अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

author img

By

Published : Jul 30, 2019, 6:08 AM IST

Updated : Jul 30, 2019, 7:17 AM IST

आंदोलनस्थळावरील छायाचित्र

अमरावती - दर्यापूर तालुक्यातील येवदा गावातील इदग्गा ते लेंडीपुरा हा प्रमुख मार्ग आहे. हा मार्ग अनेक वर्षांपासून नादुरूस्त आहे. पाऊस पडला की हा रस्ता पाण्याखाली जातो. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यासारखी पायाभूत सुविधाही नसल्याने प्रहार संघटनेच्या वतीने पाण्यात (सोमवारी) अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

पायाभूत सुविधेसाठी पाण्यात उतरून प्रहारचे अर्धनग्न आंदोलन

शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. पाणीमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तकेही भिजत आहेत. रस्त्यासारख्या मुलभूत सुविभेच्या गंभीर प्रश्नाकडे आजपर्यंत ग्रामपंचायत प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदिप वडतकर, शाखाप्रमुख योगेश चोरे यांसह प्रहारचे कार्यकर्ते व नागरिकांनी रस्त्यावर उतरून साचलेल्या पाण्यामध्ये बसून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच बाजुनेच असलेल्या लेंडी नाल्याच्या पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक यांनी लेंडी पुलाच्या नाल्यात पुलावर अर्धनग्न आंदोलन केले.

यावेळी आंदोलन स्थळी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र चौखंडे यांनी भेट दिली. यावेळी प्रदिप वडतकर यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेतबाबत सांगितले. तसेच तत्काळ रस्ता आणि पूल दुरुस्ती करावी, अन्यथा ९ ऑगस्ट रोजी लेंडी नाल्यावरील पूल तोडून टाकण्याचा इशारा यावेळी दिला.

Intro:अमरावती : पाण्यात उतरून प्रहारचे अर्धनग्ण आंदोलन ...
दर्यापूर येवदा गावातील पायाभुत सेवा सुविधा बाबत प्रहार उतरली रस्तावर

अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर तालुक्यातील येवदा गावातील इदग्गा ते लेंडीपुरा हा प्रमुख मार्ग असून हा कित्येक वर्षापासून नादुरुस्त आणि दुर्लक्षित असल्या कारणाने या रोडवरून शाळेत जाणारे विद्यार्थी शेतकरी शेतमजूर नागरिक यासारख्या असंख्य जनता तसेच वाहतूकीचे वर्दळ सुरू असते परंतु पावसाळ्याच्या तोंडावर अनेक वेळा जनतेला या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने या गंभीर प्रश्नाकडे आज पर्यत ग्रामपंचायत प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रशासनाच्या विरोधात आज प्रहारच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख प्रदिप वडतकर, शाखाप्रमुख योगेश चोरे सह प्रहारचे कार्यकर्ते व नागरिकांनी रस्त्यावर उतरून साचलेल्या पाण्यामध्ये बसून प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी केली तसेच बाजुनेच असलेल्या लेंडी नाल्याच्या पुलाच्या दुरूस्तीकरीता प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरीक यांनी लेंडी पुलाच्या नाल्यात पुलावर अर्धनग्ण होऊन लेंडीच्या पुरात उतरून ग्रामपंचायत,जिल्हा परिषद प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा निषेध करत नारेबाजी केली आंदोलन स्थळी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र चौखंडे यांना भेट दिली यावेळी प्रदिप वडतकर यांनी या रस्त्याच्या दुरा अवस्थेत बाबत सुचेना देऊन तात्काळ रस्ता ,पुल दुरूस्ती करावी तसेच ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध नोंदवून रस्त्याच्या दुरूस्ती बाबत लक्ष वेधून सदर समस्या ८ अॉगस्ट पर्यत मार्गी न लावल्यास ९ अॉगस्ट कांती दिनी लेंडी नाल्यावरील पुल तोडून टाकण्याचा इशारा सुध्दा यावेळी देण्यात आला आंदोलन केले

बाईट-प्रदीप वडतकर आंदोलक
बाईट-राजेंद्र चौखंडे ग्रामसेवकBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jul 30, 2019, 7:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.