ETV Bharat / state

निर्दयीपणाचा कळस : मोकाट श्वानावर ओतले गरम डांबर, अमरावतीमधील संतापजनक प्रकार - वसा संस्था

दिल्ली पब्लिक स्कूल परिसराजवळ अज्ञात भावनाशून्य व्यक्तीने एका श्वानावर गरम डांबर ओतल्याने प्राणीप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे. या निर्दयी घटनेमुळे खरंच माणसात माणुसपण आणि वेदना शिल्लक राहिल्यात का? असा प्रश्न यानिमित्ताने समोर येतो.

जखमी श्वान
जखमी श्वान
author img

By

Published : Jun 5, 2021, 7:10 PM IST

अमरावती - माणसाला विस्तवाचा जरासा स्पर्शही झाला किंवा शरीरावर गरम पाणी जरी पडलं तर जीव कासावीस होतो. मग विचार करा एखाद्या मोकाट श्वानाच्या अंगावर जर कुणी गरम डांबर टाकले, तर त्या श्वानाची काय परिस्थिती असेल. अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना अमरावतीमध्ये समोर आली आहे. दिल्ली पब्लिक स्कूल परिसराजवळ अज्ञात भावनाशून्य व्यक्तीने एका श्वानावर गरम डांबर ओतल्याने प्राणीप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मोकाट श्वानावर ओतले गरम डांबर

शहरातील दिल्ली पब्लिक स्कूल परिसराजवळ एका श्वानावर कोण्या अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक डांबर ओतले. हे श्वान वेदनेने व्हिवळत असल्याचे प्राणीप्रेमी बाळासाहेब विघे यांच्या निदर्शनास आले. अंगावर गरम डांबर ओतल्यामुळे श्वानाला खूप त्रास होत होता. इतकेच नाही तर श्वान पानटपरी मागे ठेवलेल्या कडप्याला पूर्ण चिकटली होती. स्थानिक नागरिकांनी तिला ओढून बाहेर काढले. तसेच बाळासाहेब विघे यांनी शहरातील जखमी-बेवारस प्राण्यांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या 'वसा' संस्थेच्या रेस्क्यू हेल्पलाईनवर याबाबतची माहिती दिली. तात्काळ वसा रेस्क्यू टीमचे सहाय्यक पशू चिकित्सक शुभम सायंके, गणेश अकर्ते, अनिमल्स रेस्क्युअर भूषण सायंके, अंकुश लोणारे आणि प्रसन्ना यांनी येऊन त्या बेवारस मादी श्वानाची सूटका केली. तिच्या अंगावर डांबर टाकल्याचे लक्षात आल्यानंतर उपचाराला तिथेच सुरुवात करण्यात आली.

डांबर गरम असल्याने तिची त्वचा भाजली असून तिला विशेष काळजी गरज आहे. त्यामुळे ती बरी होईपर्यंत तिची काळजी वसामध्ये घेत असल्याची माहिती 'वसा'चे शुभम सायंके यांनी दिली. तसेच अतिशय निर्दयपणे या श्वानाच्या शरीरावर गरम डांबर ओतणाऱ्या व्यक्तीचा आम्ही शोध घेत असून वन्यप्राण्यांना अशाप्रकारे निर्दयीपणे त्रास देणे हे योग्य नसून याप्रकरणी गुन्हाही दाखल होऊ शकतो, असे शुभम सायंके यांनी सांगितले. या निर्दयी घटनेमुळे खरंच माणसात माणुसपण आणि वेदना शिल्लक राहिल्यात का? असा प्रश्न यानिमित्ताने समोर येतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.