ETV Bharat / state

पिकअपची दुचाकीला धडक, दोन तरुणांचा जळून मृत्यू - अमरावती-परतवाडा अपघातात २ तरुणांचा मृत्यू न्यूज

अमरावती-परतवाडा मार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा भाजल्याने मृत्यू झाला.

pickup truck hits motorcycle in amravati paratwada road, 2 died
पिकअपची दुचाकीला धडक, दोन तरुणांचा जळून मृत्यू
author img

By

Published : Jan 30, 2021, 8:44 AM IST

अमरावती - अमरावती-परतवाडा मार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा भाजल्याने मृत्यू झाला. ही हृदय हेलावून टाकणारी घटना आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आसेगाव पूर्णा येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. निवृत्ती दीपक सोलव आणि राज अनंत वैद्य अशी मृतांची नावे आहेत.

निवृत्ती सोलव व राज वैद्य हे अचलपूर तालुक्यातील तळणी पूर्णा येथून दुचाकीने आसेगावकडे निघाले होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप (एमएच २७/ बीएक्स ३८१२) वाहनाची त्यांच्या दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. त्यामध्ये निवृत्ती सोलव याचा भाजल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला, तर राज वैद्य त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणत असताना वाटेतच मृत्यू झाला.

पिकअपची दुचाकीला धडक....
अपघाताची माहिती मिळताच आसेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बोलेरो वाहन चालक निंभारी येथील असल्याची माहिती पुढे आली असून, घटनेचा पुढील तपास आसेगाव पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - अपुऱ्या प्राध्यापकांच्या भरवशावर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा डोलारा; अमरावती विद्यापीठात गंभीर स्थिती

हेही वाचा - 'राज्य सरकारने 50 कोटी दिले तर 2022ला विमानतळ सुरू होणे शक्य'

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.