अमरावती - कोरोनामुळे संपूर्ण व्यवस्था जेरीस आली आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. परंतु, अमरावती शहरात पठाण चौक, जमिल कॉलनी या भागात खरेदीसाठी रात्री चक्क यात्रा भरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे कोरोना नियमांची पायामल्ली होत आहे.
रमझान ईदच्या तयारीसाठी गर्दी
14 मे रोजी रमझान ईद असल्याने शहरातील इतवारा बाजार, पठाण चौक, जमिल कॉलनी आदी भागात मेवा, मिठाई, फळं आणि कपड्यांची दुकानं थाटली आहे. दिवसा या ठिकाणी शांतता दिसते. परंतु रात्री नागरिक विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी परिसरात मोठी गर्दी करत आहेत.
प्रशासनाची डोळेझाक
सकाळी 11 नंतर सर्व बाजारपेठ, दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत. दिवसा शहरात गर्दी असली तरी बाजापेठ बंद ठेवण्यासाठी महापालिका कर्मचारी आणि पोलीसांकडून धाक दाखवल्या जात आहे. परंतु, इतवारा बाजार, पठाण चौक परिसरात रात्री यात्रा भरल्यासारखी गर्दी बघायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष आहे की नाही?, तसेच अधिकारी या भागात कारवाई का करत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा - अभिनेता दिलीप ताहीलच्या मुलाला 56 ग्रॅम मेफेड्रोनसह अटक