अमरावती - लॉकडाऊनच्या काळात कुणीही उपाशी राहू नये, यासाठी शहरातील गरिबांसाठी युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने जेवणाची व्यवस्था केली आहे. दररोज एक हजार जण जेवण करतील, अशी सुविधा करण्यात आली आहे.
शहरातील राजापेठ परिसरात स्थित युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालय परिसरात गरिबांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या संकटाच्या काळात गरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये, या उद्देशाने एक हजार लोक दररोज जेवण करू शकतील अशी व्यवस्था केली असल्याचे युवा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आमदार रवी राणा म्हणाले.
शहरातील 42 हजार गरिबांच्या घरी आम्ही किराणा पोचविला असून आता सोशल डिस्टनिंगच्या माध्यमातून गरिबांसाठी जेवणाची व्यवस्था केली असल्याचे आमदार राणा म्हणाले.