ETV Bharat / state

भाजपची जन आशीर्वाद यात्रा म्हणजे थोतांड, मंत्री यशोमती ठाकूर यांची टीका - केंद्र सरकारच्या योजना बातमी

केंद्र सरकारच्या योजना, केंद्र सरकारने केलेले कामे हे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपकडून राज्यभर जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा म्हणजे थोतांड असल्याची टीका मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

मंत्री यशोमती ठाकूर
मंत्री यशोमती ठाकूर
author img

By

Published : Aug 16, 2021, 4:37 PM IST

Updated : Aug 16, 2021, 4:51 PM IST

अमरावती - केंद्र सरकारच्या योजना, केंद्र सरकारने केलेले कामे हे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपकडून राज्यभर जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. आज केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड, नारायण राणे, डॉ. भारती पवार आणि डॉ. कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणाहून या यात्रेला सुरुवात झाली आहे. भाजपचे चार नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. दरम्यान, भाजपच्या या जनआशीर्वाद यात्रेवर मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार टीका केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारची झालेली नामुष्की आणि बदनामी हे सावरण्यासाठी हे सर्व भाजपचे थोतांड असल्याची टीका मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

कोरोनामुळे देशातील बिकट स्थितीला केवळ प्रधानमंत्री जबाबदार

कोरोनामुळे देशातील बिकट स्थितीला केवळ पंतप्रधान मोदी हेच कारणीभूत आहेत. हॅलो ट्रम हा कार्यक्रम त्यांनी घेतला नसता तर कोरोना इतका वाढला नसता. स्वतःवर येऊ नये म्हणून त्यांनी हे सर्व मरकजवर टाकलं आणि त्यातून देशात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही मंत्री ठाकूर यांनी केला.

गंगेतील प्रेतामूळे आपला देश ओळखला जातो

उत्तरप्रदेशमध्ये ते गंगा साफसफाई करणार होते. मात्र, त्याच गंगा नदीमध्ये हजारो प्रेत संपूर्ण जगाने बघितले. आता आपला देश स्मशानातील धुरामुळे व गंगेतील प्रेतामूळे ओळखला जातो. याची जर सारवासारव ते करत असतील तर देव त्यांना माफ करो, असेही मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

आम्ही संघटनात्मक बांधणी केली तर त्यात काय चुकीच

सध्या मंत्री यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात युवा संवादच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांचे मेळावे सुरू आहे. याबाबत मंत्री ठाकूर म्हणाल्या, आम्ही सातत्याने कार्यकर्त्यांना भेटत असतो त्यांच्या भेटीगाठी घेत असतो. त्यातूनच युवा संवाद घडतो. आम्ही जर संघटनात्मक बांधणी केली तर त्यात वावगे काय, असेही मंत्री ठाकूर म्हणाल्या.

हेही वाचा - पोलीस उपयुक्तांच्या जाचाला कंटाळून पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या ! ऑडिओ क्लिप व्हायरल

Last Updated : Aug 16, 2021, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.