अमरावती - राज्याचे मंत्रिमंडळ कोरोनाच्या सावटात आहे. अशात राज्यमंत्री बच्चू कडू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देत आहेत. सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने सर्वांनीच कोरोनाचा धसका घेतला आहे. त्याला मंत्रिमंडळही अपवाद नाही. दरम्यान, बच्चू कडू यांनी कोरोनाचा कुठलाही धसका न घेता नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांसाठी बांधावर जात आहेत.
बुधवारी आलेल्या गारपीट व मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी एकही मंत्री आमदार पुढे आले नाहीत. परंतू राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कोरोनाची कुठलीही भीती न बाळगता चक्क शेताच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.