अमरावती - माझ्या पतीने आत्महत्या केली तर, तहसीलदार धिरज थुल, ठाणेदार परदेशी, बीट जमादार तायडे, बच्चू कडू यांचे खाजगी स्वीय सहाय्यक दीपक भोंगाडे व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अमरावती जिल्ह्यातील देउरवाडा येथील एका शेतकऱ्याच्या पत्नीने पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांत तक्रार करणाऱ्या महिलेचा शेतकरी पती हा चिठ्ठी लिहून बेपत्ता झाला आहे. शेताच्या वादातून हा प्रकार समोर आला असून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा पोलीस शोध घेत आहे.
शेतातील रस्त्यावरून वाद -
कुठलीही दमदाटी केली नाही -
राज्यमंत्री बच्चू कडू यांचे खाजगी स्वीय सहाय्यक असलेले दिपक भोंगाडे यांच्या नातेवाईकाचे शेत विजय सुने या शेतकऱ्याच्या शेताजवळ आहे. त्या शेतातील शेतमाल बाहेर आणायचा होता. मात्र, विजय सुने यास नकार देत होते. त्यामुळे तहसीलदार यांच्या परवानगीने पोलीस बंदोबस्त करून हा शेतमाल बाहेर काढायचा होता. त्यासाठी विजय सुने यांना माहिती देण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलावले होते. त्यांच्या सोबत कुठलीही दमदाटी केली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्याने काय लिहले चिठ्ठीत
काही दिवसांपूर्वी तहसीलदार यांनी माझ्या मागे काढलेला आदेश माझे नुकसान करणार आहे. या आदेशामुळे माझी मानसिकता खूप खराब झाली आहे. गेल्या ५-६ दिवसापासून पोलिसांनी मला फोन करून धमकावले आहे. त्यामुळे मी पूर्णपणे हरलो आहे. त्यामुळे मी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने घर सोडून जात आहे, असे चिठ्ठीत लिहले आहे.