ETV Bharat / state

मेळघाटातील वीरजवानाला अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Amravati update

वीरमरण प्राप्त झालेल्या आपल्या लाडक्या सुपुत्राचे अंत्यदर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती.

मेळघाटातील वीरजवानाला अखेरचा निरोप
मेळघाटातील वीरजवानाला अखेरचा निरोप
author img

By

Published : Dec 27, 2020, 5:00 PM IST

अमरावती - मेळघाटातील पिंपळखुटा गावचे २७ वर्षीय सुपुत्र कैलास दहिकर यांना पाच दिवसांपूर्वी कुलू मनाली येथे वीरमरण आले. मागील आठ वर्षांपासून ते सैन्यात सेवा देत होते. आज त्यांचा पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशासाठी सेवा देत असतांना वीरमरण प्राप्त झालेल्या आपल्या लाडक्या सुपुत्राचे अंत्यदर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती.

कडाक्याच्या थंडीमूळे पेटवलेल्या शेगडीचा झाला स्फोट -

२७ वर्षीय सैनिक कैलास कालुदास दहिकर हे वयाच्या १७ व्या वर्षी सैन्यात दाखल झाले होते. सध्या ते बिहारच्या पंधरा रेजिमेंटमध्ये आपली सेवा देत होते. अशातच पाच दिवसांपूर्वी कुलू मनाली मध्ये कर्तव्यावर असतात. कडाक्याच्या थंडीमूळे पेटवलेल्या शेगडीचा भडका उडून त्यांचा स्फोट झाला होता. यामध्ये सैनिक कैलास कालुदास दहिकर यांना वीरमरण आले.

पत्नी व कुटूंबाने केला आक्रोश-

त्यानंतर तबल पाच दिवसांनंतर त्यांचे पार्थिव मूळगाव पिंपळखुटा येथे आणण्यात आले. दुपारी दीड वाजताच्या दरम्यान कैलास दहिकर यांचे पार्थिव गावात दाखल झाले होते. सैन्यात भरती असलेल्या पतींचे पार्थिव पाहून पत्नी व कुटूंबाने एकच आक्रोश केला होता. गावाच्या सुपुत्राचे पार्थिव गावात येत असल्याने घरोघरी रांगोळी काढून त्यांना अभिवादन करण्यात आले.

पोलीस व सैन्यांकडून मानवंदना-

त्यानंतर कैलाश यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यासाठी मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर पोलीस व सैन्यांकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर,राज्यमंत्री बच्चू कडू,खासदार नवनीत राणा सह आदीनी पुष्पचक्र अर्पण केले.

हेही वाचा- गझनवी फोर्सच्या दहशतवाद्याला काश्मिरातून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.