ETV Bharat / state

Melghat Ghost Tree: मेळघाटच्या जंगलात रखरखत्या उन्हात पहाडांवर आढळतो 'भुत्या'; 24 तासात तीन वेळा रंग बदलणारे झाड - वृक्ष अभ्यासक जितेंद्र राठी

आपण आतापर्यंत अनेक झाडांबद्दल ऐकले आहे. पण, मेळघाटच्या जंगलात रखरखत्या उन्हात पहाडांवर अनेक वृक्षांच्या मधात एकटाच उभा असणारा भुत्या अनेकांचे लक्ष वेधतो. भुत्याकडे पाहिल्यावर तो कधी पांढरा शुभ्र दिसतो. कधी तो लाल रंगाचा होतो. तर रात्री चक्क रेडियमसारखा चमकतो. आजच्या या विशेष रिपोर्टमधून आपण भुत्याच्या झाडाविषयी सविस्तर जाणून घेवू या.

Melghat Ghost Tree
मेळघाटच्या जंगलातील भुत्याचे झाड,
author img

By

Published : Apr 19, 2023, 6:57 AM IST

मेळघाटच्या जंगलातील भुत्याचे झाड

अमरावती : आतापर्यंत आपल्याला रंग बदलणारे प्राणी माहित होते, पण रंग बदलणारे झाड देखील अस्तित्त्वात आहे. हे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो. 24 तासात तीन वेळा रंग बदलणारा हा भुत्या काही खरोखरचा भूत नाही किंवा कोणता प्राणी नाही, तर चक्क एक झाड आहे. सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटात अनेक ठिकाणी हा भुत्या आढळतो. उन्हाळ्यात ज्याप्रमाणे दिवसातून तीन वेळा वेगवेगळ्या रंगात हा भुत्या दिसतो, तो हिवाळ्यात गुलाबी आणि पावसाळ्यात गर्द हिरव्या रंगाचा होतो.

'असे' आहे भुताचे झाड : दुरून चक्क चांदीसारखे किंवा कोड फुटलेल्या व्यक्तीसारखे भासणारे भुताचे झाड हे मेळघाटात ठिकठिकाणी दाट जंगलात आढळून येते. या झाडाला भुत्यासोबतच करू, पांढरुप, कावळी, तांदूळ, सरडोल, कढई अशा विविध नावाने ओळखले जाते. मेळघाटातील आदिवासी बांधव या झाडाला भुत्या किंवा कढई असेच नेहमी संबोधत असल्याची माहिती वृक्ष अभ्यासक जितेंद्र राठी आणि अनिल चौधरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. भुताचे झाड डोंगराळ भागात आढळून येतात. रात्रीच्या अंधारात हे झाड चमकत असल्यामुळे दुरून झाड चमकतानाचे दृश्य अतिशय भयावह असे भासणारे आहे. अक्राळ विक्राळ स्वरूपाचे हे झाड चमकताना पाहून अनेकांना भूत वगैरे काही असावे, असा भास होतो. त्यामुळे ह्या झाडाला 'भुत्या' असे नाव पडले असल्याचे जितेंद्र राठी यांनी सांगितले.

उन्हाळ्यात भुत्या पक्षांचा मित्र : मेळघाटात उन्हाळ्यात मार्च महिन्यापासूनच सर्वच झाडांची पानगळ होते. भुत्याची पाने देखील गळून जातात. त्यामुळे उन्हाळ्यात चांदीसारखे चमकणारे, कधी पांढरे, तर कधी लाल असे कोड फुटलेल्या मनुष्याच्या त्वचेप्रमाणे भासणार्‍या ह्या झाडावर उन्हाळ्यात लाल रंगाची फुले येतात. या फुलांना स्पर्श केला तर त्यावर असणाऱ्या अगदी सूक्ष्म आकारातील काट्यांमुळे मनुष्याची त्वचा प्रचंड खाजवायला लागते. मात्र, ही झूमकेदार फुले काही दिवसांनी लाल रंग सोडून हिरव्या रंगाची झाल्यावर उन्हाच्या तडाख्याने त्या फुलांमधील बिया बाहेर पडतात. या बिया देखील चमकदार असतात. जंगलातील पक्षांना भूक भागविण्यासाठी या बिया अतिशय उपयुक्त ठरतात. यामुळेच पक्षांसाठी उन्हाळ्यात मित्र ठरणाऱ्या या झाडाच्या फुलांमधील बिया खाण्यासाठी पक्षी पहाटेच्या सुमारास तसेच सायंकाळी या झाडांवर मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याची माहिती देखील जितेंद्र राठी यांनी दिली.

आदिवासी बांधव करतात वृक्षाची पूजा : मेळघाटातील या भुत्या वृक्षाची आदिवासी बांधव पूजा करतात. या झाडावर आदिवासी बांधव कधी चढत नाहीत. या झाडाला कधीही पायाचा स्पर्श आदिवासी बांधव होऊ देत नाहीत. या झाडाच्या फुलांमधून निघणाऱ्या बिया आदिवासी बांधव देखील संकलित करून त्या भाजून खातात. भुत्या या झाडाच्या चमकदार साधीपासून कापड आणि दोर तयार केला जातो. भुत्या वृक्षाच्या झाडाचा उपयोग हलक्या स्वरूपाचे लाकडी साहित्य, शेती अवजारे आदी कामांसाठी केला जातो. या झाडाचा गोंद औषधी गुणयुक्त असून तो शक्तीवर्धक आहे. या झाडाच्या गोंदचा उपयोग मिठाई तयार करण्यासह औषधी, कॅप्सूल, टूथपेस्ट तसेच शृंगार साहित्यामध्ये केला जातो.

'या' वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल : मेळघाटसह महाराष्ट्रातील सर्वच डोंगराळ भागात आढळणाऱ्या भुत्याला आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. तसेच या वृक्षाच्या डिंकाला जगभर मागणी असल्यामुळे या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली आहे. या वृक्षाचे टिशू कल्चरद्वारे कृत्रिम संगोपन देखील हवे, तसे यशस्वी झालेले नाही. ज्या ठिकाणी ते यशस्वी झाले, त्या ठिकाणी त्या वृक्षांमध्ये नैसर्गिक गुण लुप्त झालेले पाहायला मिळाले. एकूणच मोठ्या प्रमाणात या वृक्षाची कत्तल केल्या जात असल्यामुळे अतिशय महत्त्वाचे असणारे हे वृक्ष दुर्दैवाने नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा : Banyan Tree : १५० वर्ष जुन्या वडाच्या झाडाला मिळाले नवजीवन; मनपाच्या उद्यान विभागाद्वारे यशस्वी पुनर्रोपण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.