अमरावती: अमरावतीला वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, हे अमरावतीकर यांची 35 वर्ष जुने स्वप्न आहे. त्याकरिता लागणारी जागेचे अधिग्रहण झाले असून वैद्यकीय विभागाला हस्तांतरित झाली आहे. जिल्ह्याला दोन खासदार असून वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न आजतागायत प्रलंबित असल्याची खंत भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर (BJP Mayor Kiran Paturkar) व्यक्त केली आहे.
महाविद्यालयाच्या निर्मितीकडे डोळेझाक: जिल्ह्यात भाजपाचे राज्यसभा सदस्य खासदार अनिल बोंडे तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ईतर मिञ पक्षाच्या बळावर निवडून आलेल्या आणि भाजपाच्या गोटात सामील झालेल्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि अन्य भाजपाचे अन्य आमदार आहे. परंतु तरी सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीकडे डोळेझाक करून जिल्हा वाशियांचा हिरमोड करण्याचे काम लोकप्रतिनिधी करत आहे.
लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन: वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी या आधीच्या सरकारने आणि आताच्या सरकार सुद्धा कुठलेच प्रयत्न केले नाही. या विषयासंदर्भात स्थानिक नेते सरकारसोबत कुठलीच बैठक लावायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. स्थानिक खासदार तसेच आमदार असे सर्व लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन असल्याची खंत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शासनाने १५ जून रोजी मान्यता दिली आहे. नागपूरचे डॉ. संजय पराते यांच्या अध्यक्षतेत शासनाने चार तज्ज्ञांची समिती अमरावतीत आली होती. महाविद्यालयाची समितीने 3 ठिकाणांची पाहणी केली असून सकारात्मक अहवाल तयार केला होता.
सकारात्मक अहवाल तयार: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शासनाने १५ जून रोजी मान्यता दिली आहे. नागपूरचे डॉ. संजय पराते यांच्या अध्यक्षतेत शासनाने 4 तज्ज्ञांची समिती अमरावतीत आली होती. समितीने तीन ठिकाणांची पाहणी केली असून सकारात्मक अहवाल तयार केला आहे. पुढच्यावर्षी अमरावतीच्या शासकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थांना प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. जिल्हा वासीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम स्थानिक लोकप्रतिनिधी करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. श्रेयवादाच्या लढाईत जर हे वैद्यकीय महाविद्यालय अडकले असेल, तर कोणत्याही पक्षाचे नेत्यांनी यात पुढाकार घेऊन हे काम मार्गी लावावे. आणि जिल्हा वर्षाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षा किरण पातुरकर यांनी व्यक्त केली.