अमरावती - कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि प्रशासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, अमरावतीकरांच्या बेशिस्त वागणुकीमुळे शहरातील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर, कोरोना रुग्णही वाढत आहे. त्यामुळे, कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंतच सुरू राहणार आहे.
हेही वाचा - क्षुल्लक कारणावरून चांदूर रेल्वे शहरात भरदिवसा खून, एका तासात आरोपीला अटक
खाद्यगृहांना घरपोच सेवेसाठी सायंकाळी 6 पर्यंत सूट
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हे नवीन आदेश आज जारी केले असून, 30 एप्रिलला रात्री 11.59 वाजेपर्यंत हे आदेश संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहेत. या नव्या आदेशात हॉटेल, उपहारगृहे, बार आणि खाद्यगृहांना सायंकाळी 6 वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्याची सूट देण्यात आली आहे.
इतर तरतुदी कायम
पूर्वीच्या आदेशातील इतर तरतुदी कायम राहणार आहेत. सर्व रुग्णालये, लसीकरण केंद्रे, उपचार केंद्रे, प्रयोगशाळा, पेट्रोलपंप, एटीएम केंद्र, औषधालय, वैद्यकीय उपकरणे पुरविणारे उत्पादक, वितरक, विमा कार्यालये यांच्या सेवा त्यांच्या वेळेत सुरळीत सुरू राहणार आहेत.
हेही वाचा - पर्यटन नगरी मेळघाट कोरोनाचा हॉटस्पॉट; लोक नियम पाळत नसल्याने आरोग्य यंत्रणा हतबल