अमरावती - आज बडनेरा रेल्वे स्थानकावर साडेबाराच्या सुमारास हावडा-मुंबई या रेल्वे गाडीला ब्रेक बाइंडिगमुळे एस ११ या कोचच्या खालील बाजूस आग लागली. ही घटना फलाटावर कार्यरत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली, त्यांनी याची माहिती ताबडतोब आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. लगेचच या आगीवर फोमचा मारा करीत ही आग विझविण्यात आली.
यानंतर रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण कोचचे निरीक्षण केले. या आगीमुळे हावडा-मुंबई रेल्वे एक तास बडनेरा रेल्वे स्थानकावर उभी होती, नंतर या गाडीला मुंबईकडे रवाना करण्यात आली.