ETV Bharat / state

Electrocution In Amravati : प्रवीण पोटेंच्या महाविद्यालयात विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू - Electrocution In Pote Engineering College

कठोरा परिसरात असणाऱ्या पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ( Electrocution In Pote Engineering College ) प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करणाऱ्या चार जणांना विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे ते जागीच ठार ( Electrocution In Amravati ) झाले आहेत. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमरावती
Amravati
author img

By

Published : Dec 29, 2021, 1:14 PM IST

Updated : Dec 29, 2021, 6:44 PM IST

अमरावती - शहरालगत कठोरा परिसरात असणाऱ्या पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करणाऱ्या चार जणांना विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे ( Deaths Due Electric Shock in Amravati ) ते जागीच ठार झाले. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांचा ताफा महाविद्यालय परिसरात पोहोचला असून अग्निशामक दलही महाविद्यालयात पोहोचले आहे. चारही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयात धक्कादायक घटना

कॉलेजमधील शिपायांनाच कामाला लावले -

या दुर्देवी घटनेत अक्षय सावरकर (वय 26), प्रशांत शेलोरकर (वय 31), संजय दंडनाईक (वय 45) आणि गोकुळ वाघ (वय 29) असे या चारही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ते चौघेही याच कॉलेजमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. कॉलेज प्रशसनाने बाहेरुन मजूर न बोलावता थेट कॉलेजमधील कर्मचारीच कॉलेजच्या गेटच्या रंगरोटीसाठी लावल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रंगरंगोटी करण्यासाठी लोखंडी शिडीवर सर्वजण चढले असता वरून विजेच्या तारा असल्याने या तारेचा धक्का शिडीला लागला. याचवेळी हे चारही जणांना जोरदार शॉक लागला. त्यात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गुन्हे दाखल करण्याची मागणी

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चारही मृतदेह पोलिसांनी ताब्यात तत्काळ ताब्यात घेतले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मृतांची नावे

  • अक्षय सावरकर (वय 26)
  • प्रशांत शेलोरकर (वय 31)
  • संजय दंडनाईक (वय 45)
  • गोकुळ वाघ (वय 29)

हेही वाचा - अत्तराच्या बुधल्या कोण रिकामे करत होते?, राऊतांचे भाजपला टोले; पहा काय म्हणाले राऊत

Last Updated : Dec 29, 2021, 6:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.