ETV Bharat / state

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची रात्रीही गस्त - अमरावती वन विभाग लेटेस्ट न्यूज

जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून बिबट्याचा वावर आहे. यासाठी तिवसा वन विभागाचे अधिकारी कडाक्याच्या थंडीत रात्रपाळीने माळेगाव व तळेगाव ठाकूर या जंगल भागात गस्त घालून बिबट्याचा शोध घेत आहेत.

वन विभाग
वन विभाग
author img

By

Published : Nov 29, 2020, 1:52 PM IST

Updated : Nov 29, 2020, 4:59 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून बिबट्याचा वावर आहे. शेतकऱ्यांच्या दोन जनावरांची शिकार बिबट्याने केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरात असणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. यासाठी तिवसा वन विभागाचे अधिकारी कडाक्याच्या थंडीत रात्रपाळीने माळेगाव व तळेगाव ठाकूर या जंगल भागात गस्त घालून बिबट्याचा शोध घेत आहेत.

बिबट्याला जेरबंद करण्याकरिता तिवसा वनविभागाने कसलीकंबर

तालुक्यातील शेत शिवारात बिबट्याने गाई व बैलाची शिकार केल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. तर पुन्हा तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर या भागात बिबट्यांच्या पावलांचे ठसे दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, हे ठसे बिबट किंवा वाघाचे नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

24 तासांत दोन जनावरांची शिकार -

या बिबट्याने 24 तासांत दोन जनावरांची शिकार केल्याने बिबट्याला जेरबंद करण्याकरिता तिवसा वनविभागाने कंबर कसली आहे. रात्रीच्या वेळी जंगल परिसरात वन अधिकारी बिबट्याचा शोध घेत आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहून बिबट्या आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ वनविभागाला द्यावी, असे आवाहन देखील अधिकाऱ्यांनी केले आहे. विंचुरी तळेगाव ठाकूर हा भाग जंगल परिसर असला, तरी याआधी जनावरांच्या शिकारी झाल्याच्या घटना फार कमी घडल्या आहेत. मात्र, गेल्या 24 तासातच दोन जनावरांची शिकार झाल्याने हा बिबट्या आहे की, वाघ अशी चर्चा या भागातील शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे.

हेही वाचा - 'हात धुवा' उपक्रमासाठी रोहिणी भाजीभाकरे-बिद्रींची गिनीज बुकमध्ये नोंद!

Last Updated : Nov 29, 2020, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.