ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपू लागली; शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट - पेरणी

अमरावती जिल्ह्यासह विदर्भात पावसाने मागील २ आठवड्यपासून दांडी मारली आहे. त्यामुळे जमिनीशी संघर्ष करत उगवणारे बियाणे उगवण्यापूर्वीच जमिनीत खराब झाले. यावर्षी आधीच जून महिना खाली गेला. त्यामुळे शेतकऱ्याने कशीबशी पेरणी केली. परंतु, आता पाऊसच गायब झाल्याने शेतकऱ्याचे उभे पीक डोळ्यादेखत करपू लागले आहे. पाहूया यासंदर्भातील हा रिपोर्ट.

पावसाअभावी बियाणे उगवण्यापूर्वीच जमिनीत खराब होत आहेत
author img

By

Published : Jul 18, 2019, 5:13 PM IST

Updated : Jul 19, 2019, 7:25 PM IST

अमरावती - मागील २ आठवड्यापासून अमरावती जिल्ह्यासह विदर्भात पावसाने दांडी मारली. जमिनीशी संघर्ष करत उगवणारे बियाणे उगवण्यापूर्वीच जमिनीत खराब झाले. यावर्षी आधीच जून महिना खाली गेला. त्यामुळे शेतकऱ्याने कशीबशी पेरणी केली. परंतु, आता पाऊसच गायब झाल्याने शेतकऱ्याचे उभे पीक डोळ्यादेखत करपू लागले आहे. पाहूया यासंदर्भातील हा रिपोर्ट.

पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट, पाहा स्पेशल रिपोर्ट

अमरावती जिल्ह्यातील शेतकरी गोपाळ भोजने या शेतकऱ्याने मागील वर्षी मोठ्या मेहनतीने कर्ज काढून शेती केली. परंतु, निसर्गाच्या लहरीपणाने त्यांच्या आशेची निराशा झाली. त्यामुळे निदान यावर्षी तरी निसर्ग साथ देईल, या भाबड्या आशेने त्यांनी पुन्हा कर्ज काढून पेरणी केली. पण २ आठवड्यापासून पाऊसच गायब झाल्याने आज या शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी येण्याची वेळ आली आहे.

ही परिस्थिती एकट्या गोपाळ भजने या शेतकऱ्याची नाही. तर अखरेच्या घटका मोजत असलेल्या कपाशीच्या पिकात आज नाहीतर उद्या पाणी येईल, या आशेने डवरणी करणारे शेतकरी माणिक धामणकर यांचीही हीच व्यथा आहे. त्यांनी यावर्षी ३० हजारांचे कर्ज काढून आपल्या शेतात पराटीची लागवड केली. परंतु तेही आता अखेरच्या घटका मोजत आहे. आता सरकारनेच काही तरी मदत करावी, अशी मागणी ते सध्या करत आहेत.

अमरावती जिल्ह्यात एकूण ७ लाख २८ हजार हेक्टर लागवडीचे क्षेत्र आहे. त्यातील २० टक्के शेतकऱ्यांची अद्यापही पेरणीच व्हायची आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात २२२ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. परंतु सरासरीच्या ६० टक्केच पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जाण्याच्या मार्गावर आहे. तसेच यावर्षी पाणीच नसल्याने धरणेही तहानलेलीच आहेत. भर पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखे ऊन तापत असल्याने जगण्याचा संघर्ष करत असलेल्या पिकांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे.

सध्यस्थितीत जिल्ह्यात पिकांची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु पावसाने दांडी मारल्याने आता शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.

Intro:अमरावती जिल्ह्यात पिके करपू लागली.शेतकऱ्यांन समोर दुबार पेरणीचे संकट.

अनेक ठिकाणी पाण्याअभावी बियाणे उगवलेच नाही.
-----------------------------------------------
स्पेशल स्टोरी.
-------------------------------
अमरावती अँकर
गेल्या दोन आठवड्या पासून अमरावती जिल्ह्यासह विदर्भात पावसाने दांडी मारली.जमिनीशी संघर्ष करत उगवणारे बियाणे उगवण्या पूर्वीच जमिनीत खराब झाले. यावर्षी आधीच जून महिना खाली गेला त्यामुळे शेतकऱ्यांने कशी बशी पेरणी केली परंतू आता पाऊसच गायब झाल्याने शेतकऱ्याच उभं पीक डोळ्यादेखत करपू लागलं आहे.पाहूया एक रिपोर्ट.

VO-1
अमरावती जिल्ह्यातील हे आहेत शेतकरी गोपाळ भोजने मागील वर्षीही या शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने कर्ज काढून शेती केली ,परंतु निसर्गाच्या लहरीं पणाने आशेची निराशा झाली. परन्तु या वर्षी तरी निसर्ग साथ देईल या भाबळ्या आशेने कर्ज काढून पेरणी केली. पण दोन आठवड्या पासून पाऊसच गायब झाल्याने आज या शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन पाणी पडण्याची वेळ आली .

बाईट-1-गोपाळ भोजने -शेतकरी.

Vo-2
अत्यंत बिकट परिस्थिती ही एकट्याच शेतकऱ्यांची नाही.अखरेच्या घटका मोजत असलेल्या कपाशीच्या पिकात आज नाहीतर उद्या पाणी येईल या आशेने डवरणी करणारे हे आहेत शेतकरी माणिक धामणकर यांनी यावर्षी तीस हजारांचे कर्ज काढू आपल्या शेतात पराटीची लागवड केली परंतु तेही आता अखेरच्या घटका मोजत आहे .आता सरकारनेच काही तरी मदत करावी अशी मागणी ते करताना.

बाईट-2-शेतकरी माणिकराव धामणकर 

Vo-3
अमरावती जिल्ह्यातील एकूण लागवडीचे क्षेत्र हे सात लाख अठ्ठावीस हजार हेक्टर आहे .त्यातील वीस टक्के शेतकऱ्यांची अद्यापही पेरणीच व्हायची आहे.सध्यस्थीतीत जिल्ह्यात दोनशे बावीस मिली मिटर पाऊस पडणे अपेक्षित होते. परंतु सरासरीच्या साठ टक्केच पाऊस जिल्ह्यात झाला.शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जाण्याच्या मार्गावर आहे.अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी भिस्त ही रब्बी पिकावर राहते परन्तु यावर्षी पाणीच नसल्याने धरनेही तहानलेलीच आहे.भर पावसातही उन्हाळ्यासारखी उन तापत असल्याने  जगण्याचा संघर्ष करत असलेल्या पिकांनी आता माना टाकायला सुरवात केली आहे.

बाईट-3-हिरालाल निमकर-शेतकरी 

Wkt स्वप्निल उमप 

Vo-4
सध्या स्थितीत जिल्ह्यात पिकांची परिस्थिती अतिषय वाईट झाली आहे.कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरणी केली.परन्तु पावसाने दडी  मारल्याने  आता शेतकरी मोठा चिंतेत सापडला आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jul 19, 2019, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.