ETV Bharat / state

Honey Village Story: मेळघाटातील मधाने आणला आदिवासी बांधवांच्या जीवनात गोडवा; नेमकं काय आहे 'चिखलदरा हनी'चे रहस्य... - Melghat Honey

मेळघाटात आदिवासी बांधवांकडून मधाची निर्मीती केली जाते. चिखलदरा हनी म्हणून त्यांचे मधाचे विशेष उत्पादन ओळखले जात आहे. मेळघटातील या मधाची देशभरात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

Honey Village Story
चिखलदरा हनी
author img

By

Published : Mar 4, 2023, 6:57 PM IST

Updated : Mar 4, 2023, 10:59 PM IST

आमझरी या गावाला हनी व्हिलेज अशी ओळख

अमरावती: सातपुडा पर्वत रांगेत बसलेल्या मेळघाटातील घनदाट जंगलात परंपरागत पद्धतीने मध गोळा करणाऱ्या आदिवासी बांधवांना खादी ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येते. यामध्ये मध गोळा करणे तसेच मधाचा योग्य दिशेने कसा व्यवसाय करावा याबाबत मार्गदर्शन केल्यामुळे आता 'चिखलदरा हनी' या नावाने मेळघाटचे ब्रॅण्डेड मध देशभर चवीने चांगले जात आहे. विशेष म्हणजे चिखलधरा हनीच्या माध्यमातून मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या आयुष्यात गोडवा निर्माण झाली आहे.

आदिवासी बाधवांना रोजगार: मेळघाटातील चिखलदरा लगत असणाऱ्या आमझरी या गावाला हनी व्हिलेज अशी ओळख आज मिळाली आहे. जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ अधिकारी प्रदीप चेचरे आणि स्फूर्ती क्लस्टरचे संचालक सुनील भालेराव यांच्या प्रयत्नाने या गावातील अडीचशे जणांना मध गोळा करणे, मधाचे शुद्धीकरण, पॅकेजिंग आणि वितरण याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मधाच्या व्यवसायासाठी प्रशिक्षित झालेल्या आमझरी येथील ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे मेळघाटच्या जंगलातील अतिशय दर्जेदार असे मध अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात दूरवर अनेकांना चाखायला मिळत आहे.

असे तयार होते मध: फुलांमध्ये तसेच फुलांच्या बाहेर व पानाच्या देठाजवळ मकरंद अर्थात साखरेचा गोड पातळ पदार्थ स्त्रवणाऱ्या ग्रंथी असतात मकरंद मुख्यतः उसाची साखर, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे साखरेचे तीन प्रकार असतात. बहुतेक सर्व फुलांच्या मकरंद आत उसाच्या साखरेचे प्रमाण जास्त व ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे प्रमाण कमी असते. मधमाशा फुलपाखरांवरून मकरंद गोळा करून त्यांच्या वसाहतीत आणतात व त्याचे रूपांतर मधामध्ये करतात.

मेळघाटातील मधाचा स्वाद: मेळघाटात आज उपलब्ध होणाऱ्या मधाला लाल पिवळा आणि काळसर असे विविध प्रकारचे रंग आहेत. मधाच्या रंगाप्रमाणेच ज्या झाडांच्या फुलांपासून मधमाश्या मकरंद गोळा करतात. त्या झाडांवर मधाचा स्वाद देखील अवलंबून असतो जांभूळ, शीसम, निलगिरी, लिची, खैर ,ओवा, बाभूळ इत्यादी फुलांपासून गोळा केलेल्या मेळघाटातील मधाला स्वतंत्र अशी चव आहे.

या मधला अधिक मागणी: मेळघाटात मध गोळा करण्यासाठी मधमाशांच्या सर्वाधिक पेट्या ह्या जांभूळ आणि मोहाच्या झाडांवर लावल्या जातात. मेळघाटातील जंगलात मार्च महिन्यात जांभळाच्या झाडांना फुलोरा येतो त्यापासून जांभळाचा मध मिळतो गडद रंग व विशिष्ट कडवट चव हे या मधाचे वैशिष्ट्य आहे. हे मध अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध होते. जांभूळ मत सेवनाने दृष्टी सुधारण्यास तसेच मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास आणि हिरड्यांच्या मजबुतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. मेळघाटच्या जंगलात मोहाची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. उन्हाळ्यात मार्च-एप्रिल महिन्यात या झाडाला फुलोरा येतो व त्यापासून मधमाशा मध गोळा करतात. मोहाचे मध सर्दी, खोकला, सांधेदुखी याकरिता अत्यंत गुणकारी आहे. मोहाच्या मधामध्ये 'ब' जीवनसत्व मिळते.

'चिखलदरा हनी'ला सर्वत्र मागणी: स्फूर्ती क्लस्टरचे संचालक सुनील भालेराव यांनी 'ईटीव्ही भारत' सोबत मध निर्मीतीबाबत संवाद साधला. ते म्हणाले की, अवघ्या अडीच तीन वर्षांपासून मेळघाटात चिखलदरा लगतच्या आमझरी या गावाला मधाचे गाव अशी ओळख मिळाली आहे. अतिशय चवदार आणि औषधी गुण असणारे मध या परिसरात मिळत असून चिखलदरा हनीला आता सर्वत्र मागणी वाढली आहे. खादी ग्रामोद्योग तसेच स्फूर्ती क्लस्टरच्यावतीने देशभरात विविध ठिकाणी 'चिखलदरा हनी' पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सध्या अमरावती शहरात आयोजित कृषी मेळाव्यात देखील चिखलदरा हनीला अमरावतीकरांसोबतच जिल्ह्यातील अनेकांची पसंती मिळत आहे. मधाच्या माध्यमातून मिळालेल्या रोजगारामुळे चिखलदरा आमझरी परिसरातील तरुणांच्या आयुष्याला सुखद कलाटणी मिळाली असल्याचेही सुनील भालेराव यांनी सांगितले.

हेही वाचा: Onion Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कांद्याला मिळणार 'इतके' अनुदान

Last Updated : Mar 4, 2023, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.