ETV Bharat / state

Chandrakant Patil On Ink AttacK : शाईची भीती नाही, आता आठ शर्ट असतात माझ्यासोबत : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil On Ink AttacK : सुरक्षेची वगैरे इतकी काळजी खरंतर नकोच, शेवटी जे व्हायचं ते होतंच. माझ्यावर आतापर्यंत दोनवेळा शाई फेकण्यात आली. शर्टवर शाई फेकली असतानाही मी तासभर लोकांचे निवेदन स्विकारले आहेत. शाई फेकण्याची आता भीती वाटत नाही. आता माझ्याकडे आठ शर्ट सोबत असतातच, असे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

Chandrakant Patil On Ink AttacK
चंद्रकांत पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 7:21 PM IST

शाई हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती : Chandrakant Patil On Ink AttacK : शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मी आढावा बैठक घेत होतो. तेव्हा मला भेटायला अनेक जण आलेत, असा 'एसएमएस' आला. बैठक आटोपताच मी निवेदन घेऊन येणाऱ्या सात ते आठ जणांना भेटलो. त्यांच्याशी संवाद देखील साधला. मी तर अति सामान्य व्यक्तींना देखील भेटलो. त्यांच्याशी बोललो, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. (Chandrakant Patil visit to Amravati)

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली खबरदारी : जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील पहिल्यांदा अमरावतीत आले असता, जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या बैठकीत गोंधळ होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या खबरदारीबाबतची दखल चंद्रकांत पाटील यांनी देखील घेतली. मात्र, जे व्हायचे ते कोणी टाळू शकत नाही, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

पोलीस कुटुंब आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन : पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कवायत मैदानावर पोलीस अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या शिबिरास खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सर्वश्री प्रताप अडसड, प्रवीण पोटे-पाटील, रवी राणा, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक एम. राकेश कलासागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे आदी यावेळी उपस्थित होते.

भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं : 15 ऑक्टोबर, 2023 रोजी रविवारी भाजपा नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याची घटना घडली. भीम आर्मी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय. या घटनेनंतर पोलिसांनी भीम आर्मी संघटनेचा कार्यकर्ता अजय मैंदर्गीकर याला घटनास्थळावरून ताब्यात घेतलं. जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री हवा म्हणून चंद्रकांत पाटील यांचा सोलापुरात विरोध सुरू होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. रविवारी संध्याकाळी चंद्रकांत पाटील शासकीय विश्रामगृहात येणार होते. त्या आधी विश्रामगृहाला अक्षरश: छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. या दरम्यान भीम आर्मीच्या अजय मैंदर्गीकर यानं सुरक्षा भिंत तोडून चंद्रकांत पाटलांवर शाई फेकली. यावेळी भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटी भरती विरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवण्याचाही प्रयत्न केला.

या आधीही असे प्रकार घडले आहेत : गेल्या महिन्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात भंडारा उधळण्यात आला होता. शेखर भंगाळे नावाच्या तरुणानं धनगर आरक्षणाची मागणी करत विखे पाटलांवर भंडारा उधळला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. या आधी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यातही शाईफेक करण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न झाला होता. या घटनेनंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं होतं. आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानं यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

  1. Sanjay Raut On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या आजूबाजूची माणसं नशेच्या बाजारात, आमदारांना मिळतोय लाखोंचा हप्ता
  2. Manoj Jarange Patil Sabha : विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षण पारित करा; मनोज जरांगेंची मागणी
  3. Devendra Fadnavis on contract Recruitment: कंत्राटी भरतीचा जीआर रद्द-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.