अमरावती - जिल्हा सामान्य रुग्णालयातील ( District General Hospital Amravati ) बेबी केअर सेंटरमध्ये ( Explosion at baby care center ) रविवारी सकाळी दहा वाजता झालेल्या स्फोटामुळे ( Amravati District General Hospital blast ) एक बाळ दगावल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शॉर्टसर्किटमुळे बेबी केअर सेंटरमध्ये आग ( Fire in baby care center due to short circuit ) लागली होती. त्यावेळी सेंटरमध्ये 35 नवजार बालके होती. त्यातील एक बाळ धुरामुळे दगावल्याची घटना घडली आहे.
घटनेनंतर बालकांना हलवले - शॉर्टसर्किटमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेबी केअर सेंटरला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या दोन बंबांच्या साह्याने ही आग विझवण्यात आली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांनी मोठ्या शेतातील बेबी केअर सेंटर मधील 35 बाळांना सुरक्षितपणे बाहेर काढले. दरम्यान दोन बाळांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते. तसेच इतर बालकांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले.
चौकशीचे आदेश - दरम्यान ह्या संपूर्ण प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस ( Guardian Minister Devendra Fadnavis ) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोयी सुविधा संदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलाविली आहे. या संपूर्ण घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली असून जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) आमदार रवी राणा, आमदार प्रवीण पोटे जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि डॉक्टर सुनील देशमुख यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे यांनी रुग्णालयात धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.