अमरावती - मेळघाटामध्ये गेल्या 48 तासांत 400 मी.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे सातपुडा पर्वत रांगेतील अनेक धबधबे प्रवाही झाले आहेत. धारखोरा या अत्यंत देखण्या धबधब्याने मेळघाटच्या सौंदर्यात भर घातली आहे.
परतवाडापासून घाट मार्गावर मल्हारा गावच्या बाजूला जंगलात 10 की. मी अंतरावर बुरदघाट छोटेसे गाव आहे. या गावातून 2 की.मि. अंतरापर्यंत पायी चालत गेल्यावर धारखोरा धबधबा आहे. मेळघाटातील सर्वांत मोठा आणि सर्वांत सुंदर अशी या धबधब्याची ओळख आहे. सध्या हा धबधबा ओसंडून वाहत आहे. धारखोरा धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.