ETV Bharat / state

चांदूर रेल्वेतील अशोक महाविद्यालयात प्राध्यापकाला मारहाण; गुन्हा दाखल - amravati chandur railways college news

अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथील अशोक महाविद्यालयात एका प्राध्यपकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात 2 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक महाविद्यालय, चांदूर रेल्वे
author img

By

Published : Oct 14, 2019, 1:33 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वेतील महाविद्यालयात पे फिक्सेशन बाबत विचारणा करायला गेलेल्या एका प्राध्यपकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामुळे नेहमीच विविध गोष्टींवरून चर्चेत असलेले चांदूर रेल्वे येथील स्व. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालय (अशोक महाविद्यालय) पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे.

हेही वाचा - पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान जखमी

अशोक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तपोविन नामदेवराव पाटील कार्यरत आहेत. ते मस्टरवर सही करण्यासाठी गेले. सही केल्यानंतर प्राचार्य यांच्या कक्षाबाहेर पे फिक्सेशन बाबत विचारणा करण्याकरिता थांबले असता सदर महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे मामा संजय धुर्वे यांनी तु इथे का थांबला बाहेर निघ, असे म्हणून गालावर थापड मारली आणि त्यांना शिवीगाळ केली.

अमरावतीच्या चांदूर रेल्वेतील अशोक महाविद्यालयात प्राध्यापकाला मारहाण, गुन्हा दाखल

हेही वाचा - निर्भया प्रकरणी धक्कादायक खुलासा! त्या क्रुर रात्रीची कहानी सांगण्यासाठी मित्रानेच उकळले लाखो रुपये

तर दुसरे गैरअर्जदार कार्यालय अधीक्षक गजानन रामराव कैकाडे यांनी पुन्हा इथे आला तर तुला बघून घेईल अशी धमकी देऊन दोघांनी प्रा. पाटील यांना ढकलून दिले, अशा आशयाची तक्रार अर्जदार प्रा. तपोविन पाटील यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Intro:अमरावती:चांदूर रेल्वेतील अशोक महाविद्यालयात प्राध्यापकाला मारहाण

प्राचार्याचे मामा व कार्यालय अधिक्षकावर अदखलपात्र  गुन्हे दाखल

अमरावती अँकर

नेहमीच विविध गोष्टींवरून चर्चेत असलेले अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील स्वर्गीय मदनगोपाल मुंधडा महाविद्यालयात (अशोक महाविद्यालय) पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहे. पे फिक्शेसन बाबत विचारणा करण्यासाठी प्राचार्याच्या कक्षाबाहेर थांबलेल्या प्राध्यापकाला एका गैरअर्जदाराने मज्जाव करीत मारहाण व शिवीगाळ केली तर दुसऱ्याने धमकावुन शिवीगाळ करीत लोटलाट केल्याची घटना चांदूर रेल्वे येथील अशोक महाविद्यालय घडली.

अशोक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तपोविन नामदेवराव पाटील कार्यरत आहेत. ते मस्टरवर सही  करण्यासाठी गेले. सही केल्यानंतर प्राचार्य यांच्या कक्षाबाहेर पे फिक्सेशन बाबत विचारणा करण्याकरीता थांबले असता सदर महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे मामा संजय धुर्वे यांनी तु इथे का थांबला बाहेर निघ असे म्हणून गालावर थापड मारली व शिवीगाळ केली. आणि दुसरे गैरअर्जदार कार्यालय अधिक्षक अजानन रामराव कैकाडे यांनी पुन्हा इथे आला तर तुला बघुन घेईल अशी धमकी देऊन दोघांनी प्रा. पाटील यांना ढकलून दिले अशा आशयाची अर्जदार प्रा. तपोविन पाटील यांनी चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरूध्द अदखलपात्र गुन्हानुसार भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास ठाणेदार संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.