अमरावती - जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वातोडा हिम्मतपूर या गावात शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आज दुपारी भिषण आग लागली. या आगीत चार जनावरांचा मृत्यू झाला. यात दोन बैल, एक गाय, एक गोरा (वासरू) यांचा समावेश आहे.
ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच चांदुर बाजार अचलपूर येथील अग्निशमन दलाचे जवान आणि गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.