ETV Bharat / state

अमरावती : तळेगावात संतप्त शेतकऱ्यांचा पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेराव

author img

By

Published : Jan 14, 2020, 6:15 PM IST

मोझरीपासून काही अंतरावर असलेल्या केकतपूर तलावाचे पाणी या परिसरातील गावात असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप न मिळाल्याने त्रासलेल्या शेतकऱ्यांनी भेट देण्यासाठी आलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. तसेच दुपारी अडीच तास या समस्येवर चर्चा करीत त्यावर उपाययोजना करण्याचा एकच प्रश्न उपस्थित केला.

तळेगावात संतप्त शेतकऱ्यांचा पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेराव

अमरावती - रब्बी हंगामासाठी लागणारे पाणीच अमरावतीच्या केकतपूर शेत शिवारातील शेतकऱ्यांना न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तळेगाव ठाकूर येथे उपस्थित झालेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत या समस्येचा जाब विचारला.

अमरावती जिल्ह्यात मोझरीपासून काही अंतरावर केकतपूर तलाव आहे. या तलावाला मुबलक पाणी असून या पाण्याच्या भरोश्यावर मोझरी, गुरुदेवनगर, तळेगाव ठाकूर आदी गावातील शेतकरी रब्बी हंगामाचे पीक घेतात. मात्र, यंदाच्या रब्बी हंगामासाठी अद्यापही पाणी शेतकऱ्यांना मिळालेले नाही. याबाबत त्या भागातील अनेक शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाचे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजविले, निवेदने दिले. मात्र, तरीही शेतकऱ्यांना रब्बी हंगाम कोरडाच राहिला. अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना समस्या न सुटल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला. यानंतर मंगळवारी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता हरीश देशमुख व अन्य अधिकारी उपस्थित झाले. त्यांच्यासमोर संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी चक्क अडीच तास या समस्येवर चर्चा करीत त्यावर उपाययोजना करण्याचा एकच प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा - गृहमंत्री अनिल देशमुख करणार मूकबधिर 'वर्षा'चे कन्यादान

अखेर संतप्त शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी या तलावातून पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, दुपारी अडीच ते चार वाजेपर्यंत शेतकरी त्यांच्या समस्येला घेऊन ठामपणे आपली भूमिका मांडत अधिकाऱ्यांसमोर बसले होते.

हेही वाचा - 'महापुरुषांची विटंबना केल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही'

Intro:अमरावती: तळेगावात संतप्त शेतकऱ्यांचा पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेराव.
-------------------

अमरावती अँकर

रब्बी हंगामासाठी लागणारे पाणीच अमरावतीच्या केकतपूर शेत शिवारातील शेतकऱ्यांना न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तळेगाव ठाकूर येथे उपस्थित झालेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत या समस्येचा जाब विचारला.

, अमरावती जिल्ह्यात मोझरी पासून काही अंतरावर केकतपूर तलाव आहे.या तलावाला मुबलक पाणी आहे आणि या पाण्याच्या भरवश्यावर मोझरी,गुरुदेवनगर, तळेगाव ठाकूर आदी गावातील शेतकरी रब्बी हंगामाचे पीक घेतात.मात्र यंदाच्या रब्बी हंगामासाठी अद्यापही पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही.याबाबत त्या भागातील अनेक शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाचे,जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजविले, निवेदने दिले मात्र तरीही शेतकऱ्यांना रब्बी हंगाम कोरडाच राहिला.अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना समस्या न सुटल्यास उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर आज पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता हरीश देशमुख व अन्य अधिकारी उपस्थित झाले होते.त्यांच्यासमोर संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी चक्क अडीच तास समस्येवर चर्चा करीत त्यावर उपाययोजना करण्याचा एकच प्रश्न उपस्थित केला.
अखेर संतप्त शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन या तलावातुन पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.मात्र दुपारी अडीच ते चार वाजेपर्यंत शेतकरी त्यांच्या समस्येला घेऊन ठाम पणे आपली भूमिका मांडीत अधिकाऱ्यांसमोर बसले होते.

बाईट-श्रीकृष्ण बाणते शेतकरीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.