ETV Bharat / state

Amravati Year Ender: अमरावती सरत्या वर्षात, कोरोनाची दुसरी लाट, दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, नदीत अकरा जणांचा बुडून मृत्यू आणि दंगल

सरते वर्ष अमरावती (Amravati Year Ender) जिल्ह्यासाठी क्लेशदायक आठवणी (Painful memories) सोडून जात आहे 2021 मध्ये आलेली कोरोनाची दुसरी लाट. मेळघाटात कर्तव्यावर बजावणाऱ्या वनरक्षक दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे (Deepali Chavan's suicide case) जिल्हा हळहळला. वरुड तालुक्यात वर्धा नदीत बोट उलटून अकरा जणांचा झालेला दुर्दैवी मृत्यू आणि विदर्भातील सर्वात शांत शहर अशी ओळख असणाऱ्या अमरावतीत कधी नव्हे ते उसळलेल्या दंगली मुळे (Due to the riots) जिल्हा हादरला.

Amravati Year Ender
Amravati Year Ender
author img

By

Published : Dec 20, 2021, 11:08 AM IST

Updated : Dec 28, 2021, 11:12 AM IST

अमरावती : कोरोनाचा पहिला रुग्ण 3 एप्रिल 2020 रोजी सापला. डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आला. 2021 च्या जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात कोरोन ची लाट ओसरली असताना जिल्ह्यात मात्र पुन्हा लाट आली. गंभीर बाब म्हणजे देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उगम अमरावतीतून झाला. 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात कोरोनाचे 725 रुग्ण होते. त्यामुळे 'विकेंड लॉक डाऊन' घोषित करण्यात आला. 23 फेब्रुवारीला कोरणा रुग्णांची संख्या 926 झाल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाउन लागला. 18 मार्च पर्यंत संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन होता. दुसरा लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. शासकीय आकडेवारीनुसार दुसऱ्या लाटेत सोळाशे कोरोनारुग्ण दगावले.

14 जानेवारीला पोहोचली कोरोना लस
जिल्ह्यात 14 जानेवारीला कोरोना लसीच्या 17,000 डोज प्राप्त झाल्या. नंतर जिल्हा सामान्य रुग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या पाच केंद्रांवर पहिल्यांदा लसीकरण मोहीम सुरू झाली . प्रत्येक केंद्रावर एकूण शंभर जणांना लस देण्यात आली लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 16 हजार 262 आरोग्य कर्मचाऱ्यांना आधी लस देण्यात आली.

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे हळहळ
25 मार्च 2021 च्या सायंकाळी मेळघाटात हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतः वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली गेलीा. उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून दीपाली यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये ही अस्वस्थता होती. हे प्रकरण चांगलेच गाजले. एखाद्या महिला अधिकाऱ्याने कर्तव्यावर असताना आत्महत्या केल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना होती. या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यासह मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला.

रासायनिक कारखान्यात अग्नितांडव
एमआयडीसी परिसरात नॅशनल बॅटरी साइज अँड केमिकल या रसायन निर्मीती कारखान्याला 28 ऑगस्ट रोजी भीषण आग लागली. अमरावती महापालिकेसह जिल्ह्यातील 14 नगर परिषदेतील अग्निशमन दलाच्या बंब यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. या कारखान्यापासून काही अंतरावरच नागरी वसाहत असून प्रशासनाने घेतलेल्या काळजीमुळे भीषण घटना टळली.

वर्धा नदीत बोट उलटून 11 जणांना जलसमाधी
सरत्या वर्षात चटका लावून जाणाऱ्या घटनांपैकी 14 सप्टेंबर रोजी वरुड तालुक्यात येणाऱ्या झुंज ह्या गावात घडली. वर्धा नदीत बोट उलटल्यामुळे 11 जण नदीत बुडाले. यात दोन वर्षाच्या चिमुकलीचा ही अंत झाला होता. वरुड तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवासी रवी म्हात्रे या व्यक्तीचा दशक्रिया विधी आटपून त्यांचे नातेवाईक रक्षा विसर्जनासाठी तेथे गेले असता नदीकाठी बांधलेली बोट सोडून एकूण 13 जण बोट मध्ये स्वार झाले. प्रचंड प्रवाहात बोट उलटल्यामुळे 13 पैकी 11 जणांचा मृत्यू झाला.

रेमडिसीवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट
कोरोना च्या दुसऱ्या लाटेचे थैमानअसताना रुग्णांसाठी आवश्यक रेमडीसिविर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा अमरावती पोलीसांनी 13 मे रोजी पर्दाफाश केला. या प्रकरणात दोन डॉक्टरांसह सहा जणांना अटक करण्यात आली. डॉ. पवन मालसुरे,डॉ. अक्षय राठोड यांच्यासह शुभम सोनटक्के, शुभम किल्लेकर, अनिल पिंजरकर यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका परिचारिकेला अटक करण्यात आली. विभागीय सेवा संदर्भ रुग्णालयातील एक अटेंडंट काळाबाजार करीत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी सापळा रचला. यात सहाशे रुपये किंमतीचे इंजेक्शन 12 हजार रुपयात विकले जात होते.

तीस हजाराहून अधिक कोंबड्या केल्या नष्ट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्हा हादरला असताना 27 फेब्रुवारीला अमरावती शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भानखेडा परिसरातील धिमान पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांना बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिल्यामुळे खळबळ उडाली. या अहवालानंतर या पोल्ट्री फार्म सह परिसरातील इतर पोल्ट्री फार्म मधील एकूण तीस हजार कोंबड्या खोल खड्डा करून नष्ट करण्यात आल्या.

पोलीस कोठडी आत्महत्येच्या दोन घटना
राजापेठ पोलीस ठाण्यात 19 ऑगस्ट रोजी आणि वलगाव पोलीस ठाण्यात 23 सप्टेंबर रोजी आरोपींनी कोठडीत गळफास लावून आत्महत्या केल्या. अल्पवयीन युवतीला फूस लावून पळविलाच्या प्रकरणात सागर ठाकरे या युवकाला फ्रेजरपुरा पोलीसांनी राजापेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. त्याने 19 ऑगस्टच्या सकाळी कोठडीच्या दाराला शर्टद्वारे गळफास घेतला. या घटनेनंतर अवघ्या महिन्याभरात 24 सप्टेंबर रोजी वडगाव पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अरुण जवंजाळ या 50 वर्षीय व्यक्तीने ठाण्यातील पंख्याला शर्ट बांधून गळफास घेतला.

पवनीत कौर नव्या जिल्हाधिकारी
यावर्षी अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची बदली झाल्यावर त्यांच्या जागी 15 जुलै रोजी अवणीत कौर या नव्या जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या.

दगडफेक करताच उसळली दंगल
विदर्भातील सर्वात शांत शहर म्हणून ओळख असणाऱ्या अमरावती शहरात 12 आणि 13 नोव्हेंबरला दंगल उसळली. 12 नोव्हेंबर रोजी रजा अकादमीच्या वतीने त्रिपुरा येथील मशिदीवर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान मोर्चात सहभागी काहींनी दगडफेक केली. तसेच अनेक दुकानांची तोडफोड केली. या घटनेच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी 13 नोव्हेंबर रोजी भाजपच्या वतीने अमरावती बंद पुकारण्यात येऊं राजकमल चौक येथे निषेध नोंदवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते एकत्रित आले. दरम्यान सकाळी 9:30 च्या सुमारास एका जमावाने दुकानांची तोडफोड आणि दगडफेक करताच शहरात दंगल उसळली. या घटनेनंतर दुपारी पोलीसांनी शहरात संचारबंदी घोषित केली. यादरम्यान अमरावती शहर पोलीसांसह नागपूर अकोला बुलढाणा आदी जिल्ह्यातून पोलीस पथक अमरावती तैनात करण्यात आले होते राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी सुद्धा संचारबंदी दरम्यान अमरावती तैनात होती. 23 नोव्हेंबरपर्यंत शहरात पूर्णतः संचारबंदी होती या दरम्यान पहिल्यांदाच शहरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. 23 नोव्हेंबरपासून 12 डिसेंबर पर्यंत रात्री नऊनंतर शहरात संचारबंदी लागू होती. 13 डिसेंबर पासून मात्र संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली आहे.

Last Updated : Dec 28, 2021, 11:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.