ETV Bharat / state

भंगार कारमध्ये आढळला सात वर्षीय बालकाचा मृतदेह - भंगार

वरूडच्या शिक्षक कॉलनीलगतच्या एका शेतात मजूर कैलास पंधरे, पत्नी व मुलगा अजय हे वास्तव्यास आहेत. ५ मे रोजी सकाळी ११ वाजता अजय घराशेजारीच खेळत असताना अचानक तो बेपत्ता झाला होता. यादरम्यान कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध केली. परंतु तो कुठेच आढळून न आल्याने अखेर ७ तारखेला आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

भंगार कारमध्ये आढळला सात वर्षीय बालकाचा मृतदेह
author img

By

Published : May 11, 2019, 1:36 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील वरुड येथील शिक्षक कॉलनी जवळ शेतात वास्तवात असलेल्या सात वर्षीय बालकाचा मृतदेह एका भंगार कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला. अजय कैलास पंधरे असे या बालकाचे नाव असून पाच दिवसापासून तो बेपत्ता झाला होता. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

भंगार कारमध्ये आढळला सात वर्षीय बालकाचा मृतदेह

वरूडच्या शिक्षक कॉलनीलगतच्या एका शेतात मजूर कैलास पंधरे, पत्नी व मुलगा अजय हे वास्तव्यास आहेत. ५ मे रोजी सकाळी ११ वाजता अजय घराशेजारीच खेळत असताना अचानक तो बेपत्ता झाला होता. यादरम्यान कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध केली. परंतु तो कुठेच आढळून न आल्याने अखेर ७ तारखेला आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्या दिशेने तपास केला. दरम्यान, गुरुवारी वरुड पांढुरणा रस्त्यालगत असलेल्या एका साईकृपा सर्व्हिसिंग सेंटरसमोर नालीचे बांधकाम करत असलेल्या मजुरांना दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्यांनी भंगारात पडलेल्या सोनेरी रंगाच्या कारजवळ पाहणी केली. यावेळी त्यांना भंगार कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत चिमुकल्या अजयचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीसांनी घातपाताच्या दिशेने बारकाईने निरीक्षण करुन माहिती घेतली. तसेच अमरावती येथून फॉरेन्सिक चमूला पाचारण करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ५ मे रोजी अजय कारचे दरवाजे उघडून आतमध्ये गेला असावा. त्यानंतर कारचा दरवाजा बंद झाला असावा. तसेच कारचे काचाही बंद असल्याने अजयकडून ते न उघडल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Intro:अमरावतीच्या वरूड मधून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला भंगार कार मध्ये.

घटनेने शहरात खळबळ
----------------------------------------------
अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील शिक्षक कॉलनी जवळ एका शेतात वास्तवात असलेल्या व पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अजय कैलास पंधरे या सात वर्षीय बालकाचा मृतदेह काल एका भंगार कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Vo
वरूडच्या शिक्षक कॉलनी लगतच्या एका शेतात मजूर कैलास पंधरे ,पत्नी व मुलगा अजय आपल्या हे वास्तव्यास आहे. पाच मे रोजी सकाळी 11 वाजता अजय घराशेजारीच खेळत असताना अचानक तो बेपत्ता झाला होता. या दरम्यान कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध केली परंतु तो कुठेच आढळून न आल्याने अखेर सात तारखेला आई ने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती .याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्या दिशेने तपास केला होता. दरम्यान काल वरुड पांढुरणा रस्त्यालगत असलेल्या एका साईकृपा सर्विसिंग सेंटर समोर नालीचे बांधकाम करत असलेल्या मजुरांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी भंगारात पडलेल्या सोनेरी रंगाच्या कारजवळ पाहणी केली असता .या भंगार कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत चिमुकल्या अजयचा मृतदेह आढळून आला .घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. आता पोलीस घातपाताच्या दिशेने बारकाईने निरीक्षण करुन माहिती घेतली. दरम्यान अमरावती येथून फॉरेन्सिक चमूला पाचारण करण्यात आले आहे .

प्रकरणात अनेक तर्कवितर्क पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पाच मे रोजी अजय हा या कारचे गेट उघडून बसायला कारमध्ये गेला असावा .कारचे गेट बंद होऊन काचाही बंद होत्या त्यामुळे अजय कडून गेट न उघडल्याने तापत्या ऊन्हामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.