ETV Bharat / state

चांदुर बाजारात ४६ किलो गांजासह ५ आरोपींना अटक - weed news today

चांदुर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत खरवाडी गावा नजीक सापळा रचून ४६ किलो ३०० ग्राम गांजा पकडण्यात आला. याची बाजार भावाप्रमाणे अंदाजे किंमत ५लाख ५५ हजार ८४० रूपये इतकी आहे.

गांजासह आरोपींना अटक
गांजासह आरोपींना अटक
author img

By

Published : Dec 18, 2020, 7:58 PM IST

अमरावती - चांदुर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत खरवाडी गावा नजीक सापळा रचून ४६ किलो ३०० ग्राम गांजा पकडण्यात आला. याची बाजार भावाप्रमाणे अंदाजे किंमत ५लाख ५५ हजार ८४० रूपये इतकी आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. या गांजा तस्करीची साखळी जिल्हाभर पसरली असून, यात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशी केली कारवाई-

शहरात प्रत्येक महिन्याला मोठ्या प्रमाणात तस्करीचा गांजा येत असल्याची माहिती एस.पी.पथकाला होती. त्यानुसार या पथकातील अधिकारी, गांजा तस्करांच्या मागावर होती. १८ डिसेंबरला मिळालेल्या गुप्त माहिती वरून, संबंधीत तस्करांचे मोबाईल वरून लोकेशन तपासण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील खरवाडी येथे सापळा रचण्यात आला. सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान दोन मोटरसायकल वरून तस्करीचा गांजा पकडण्यात आला. यात गांजासह ६० हजार रूपये किंमतीच्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या.

आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून येतो गांजा-

याप्रकरणात एकूण ६ लाख १५ हजार ८४० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच पाच आरोपींना अटक करण्यात आली. सुरज अविनाश शेळके उर्फ सुरू (वय ४० रा चांदूर बाजार) जावेद अली मिर आली (वय ३० रा चांदूर बाजार) शेख वशीम शेख करीम (वय २७ रा अमरावती) कृष्णा गोंड (वय २२) दिपक नेमाडे (वय ३०), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. तालुक्यात होणारी गांजा तस्करी ही, आंध्रप्रदेश मधील वरंगल व तामिळनाडू मधील विशाखापट्टणम येथून होत असल्याचा पोलीसांचा कयास आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी चांदूरबाजार पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कारवाईत यांचा होता सहभाग-

ही कारवाई पोलीस निरीक्षक तपण कोल्हे यांच्या मार्गदर्शनात, सहाय्यक पोलीस निरिक्षक अजय आखरे, हेड कॉन्स्टेबल मनोज, सुनिल, सैयद अजमल, पंकज फाटे, स्वप्निल तवर, योगेश, मंगेश, रविंद्र, यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा- अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश; शार्पशूटरने घातल्या गोळ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.