अकोला- मनपाने वाढवलेला २०२० व २०२१ चे घर कर रद्द करून सामान्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी युवा मुक्ती आंदोलन संघटनेचे अध्यक्ष मनोज भालेराव यांच्या नेतृत्वात आज मनपा समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेने मनपा प्रशासनाला दिला आहे. तसे निवेदन मनपाला देण्यात आले आहे.
जनतेवर कोरोनाचा कहर सुरू आहे. गोरगरिबांचा रोजगार गेला. त्यांना काम मिळत असले तरी त्यांना पूर्वीसारखी मजुरी मिळत नाही. त्यामुळे, ते फक्त आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याइतपतच समर्थ आहेत. अशात मनपाकडून वाढीव घर टॅक्स जमा करण्याचे काम सुरू आहे. याचा बोजा गोरगरिबांवर पडत आहे. त्यामुळे, मनपा प्रशासनाने २०२० व २१ चे घर टॅक्स माफ करावे. अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात श्रावण रंगारी, संदीप भालेराव, नागेश रामटेके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
हेही वाचा- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनात 'नो मास्क, नो डिस्टन्सिंग'