अकोला - समाज कल्याण विभागाने गेल्या 2 वर्षांपासून लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाला बेशरमच्या झाडाचे तोरण लावून गुरुवारी अनोखे आंदोलन केले. यावेळी समाज कल्याण अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते.
हेही वाचा -'वंचित'कडून एमआयएमला आठ जागांची ऑफर; एमआयएम-वंचित वेगळे लढणार?
रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या 2 वर्षांपासून समाज कल्याण विभागाने पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे आतापर्यंत एकही घरकुल पूर्ण झाले नाही. समाज कल्याण विभागाकडे पैसे असतानाही त्यांनी पैसे न दिल्यामुळे हजारो लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. याला सर्वस्वी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जबाबदार आहेत.
हेही वाचा -विधानसभा रणधुमाळी : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ९० टक्के जागा वाटपाचा सुटला तिढा
त्यामुळे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे आणि आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.